जळगाव । गडचिरोली येथे प्रकल्प अधिकारी म्हणून कार्यरत असलेले लातुर येथील प्रशासकीय अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांची जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे. ते शुक्रवारी 28 रोजी जिल्हा परिषदेत रुजु झाले. पदभार स्विकारल्यानंतर त्यांचा शनिवारी पहिलाच दिवस होता. जिल्हा परिषद ही ग्रामीण भागाचे प्रतिनिधीत्व करत असते. ग्रामीण जनतेच्या विकासाकरीता जिल्हा परिषदेच्या सुक्ष्म नियोजनावर भर देणे गरजेचे असून त्यावर लक्ष केंद्रीत करणार असल्याने नवनियुक्त सीईओ दिवेगावकर यांनी सांगितले. दिवेगावकर हे 2013 च्या बॅचचे प्रशासकीय अधिकारी आहे. जिल्ह्याला घरकुल, स्वच्छ भारत अभियानांतर्गत शौच्छालय बांधकामाचे मोठे लक्ष देण्यात आले असून लक्ष पुर्तीसाठी, जिल्ह्यातील लिंगगुणोत्तर वाढविण्यासाठी प्रयत्न करणार असून लोकांच्या गरजा ओळखुन कामांना प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पुष्पगुच्छ नाकारले
नवनियुक्त सीईओंनी पदभार घेतल्यानंतर शनिवारी त्यांचा जिल्हा परिषदेचा कामाचा पहिलाच दिवस होता. पहिल्या दिवशी त्यांनी सर्व विभागाच्या विभागप्रमुखांशी चर्चा करुन जिल्हा परिषदेचे कामकाज समजुन घेतले. त्यांच्या स्वागतासाठी अधिकारी कर्मचार्यांनी पुष्पगुच्छ आणले होते. मात्र त्यांनी पुष्पगुच्छ नाकारले. पुष्पगुच्छांवर वायफळ खर्च करण्यापेक्षा त्याच खर्चात गरजु गरिबांच्या मुलांना पुस्तक, वह्या देण्याचे आवाहन केले. अस्तिककुमार पांण्डेय यांच्या कार्यकाळात अनेक नाविन्यपुर्ण योजना राबविण्यात आले असून त्या अत्यंत उल्लेखनीय आहे. तेच उपक्रम कायम
राबविले जाणार आहे.