ग्रामीण साहित्य हे वास्तविकतेचे उदाहरण

0

मुक्ताईनगर। येथील साहित्यिक तथा व्यवसायाने ग्रामसेवक असलेले प्रमोद पिवटे यांच्या मेळावा या कथासंग्रहाचे प्रकाशन नुकतेच शिवचरण उज्जैनकर फाऊंडेशनचे अध्यक्ष एस.एम. उज्जैनकर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साहित्यिक दिपध्वज कासोदे होते तर चित्रपट, कथाकार, ग्रामीण लेखक निंबाजी हिवरकर, साहित्यिक अ.फ. भालेराव हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रसंगी लेखक पिवटे यांनी उपस्थितांचा सत्कार केला.

साहित्य म्हणजे जीवनाचा आनंद
यावेळी उज्जैनकर म्हणाले की, साहित्य म्हणजे जीवनाचा आनंद आहे त्याचबरोबर समाज प्रबोधनाचे कार्य सुध्दा साहित्यच करते. पिवटे यांच्या कथासंग्रह ग्रामीण जीवनावर प्रकाश टाकणारे असल्याचे उज्जैनकर यांनी सांगितले. सुत्रसंचालन कवी रा.का. ढोले यांनी केले. प्रसंगी पंचायत समिती सदस्य राजेंद्र सावळे, कवी जयवंत बोदडे, नितीन भोंबे, सुधाकर पाटील, दिपक पाटील, तेजस फेगडे, किरण सावकारे, सतिश वराडे, शरद बोदडे उपस्थित होते.