ग्रामोद्योग संघाची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध

0

शिरपूर। शिरपूर तालुका विविध कार्यकारी ग्रामोद्योग संघ लि. शिरपूर या संस्थेच्या सन 2017 ते 2022 पर्यंतच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणुक बिनविरोध पार पडली. दि.5/5/2017 रोजी संस्थेच्या कार्यालयात अध्यासी अधिकारी तथा उपलेखा परिक्षक सहकारी संस्था शिरपूर यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची बैठक झाली. त्यात चेअरमनदी अंबर गुलाब बेलदार तर व्हा.चेअरमनपदी कमल युवराज ठोंबरे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. अंबर बेलदार यांना चेअरमन पदासाठी सुचक भिका सुतार तर अनुमोदक विश्‍वास कुंभार होते. ठोंबरे यांना व्हा.चेअरमन पदासाठी सुचक गोकुळ कुंभारव अनुमोदन रायसिंग हिलाल यांनी दिले. चेअरमन व व्हा.चेअरमन पदासाठी प्रत्येकी 1-1 नामनिर्देशनपत्र दाखल झाल्याने निवडणुक अधिकारी एम.आर.चव्हाण यांनी बिनविरोध निवडून आल्याचे घोषित केले.

नवनिर्वाचित संचालक
1) भिका वामन सुतार-पिळोदा, 2) अरूण हिलाल रायसिंग- थाळनेर, 3) अंबर गुलाब बेलदार- सांगवी, 4) हिरालाल हरफुल कुंभार, 5) गोकुळ रामदास कुंभार- बोराडी, 6) प्यारेलाल चिंधा महिरे – वनावल. अनु.जाती जमाती प्रतिनिधी- 7) आक्काबाई नारायण वाघ- गिधाडे, 8) लिलाबाई शिवदास कुंभार- कुंभार, 9) सौ.कमल युवराज ठोंबरे – कोडीद (महिला प्रतिनिधी), 10) विश्‍वास मंगा कुंभार- ताजपुरी (इतर मागास प्रवर्ग), 11) राजू अंबर सोनवणे- सांगवी (वि.जमाती व भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्ग) यांची बिनविरोध निवड झाली. निवडणुक निर्णय अधिकारी एम.आर.चव्हाण तर सहाय्यक म्हणून खादी ग्रामोद्योग सचिव खेडकर यांनी संपूर्ण निवडणुक प्रक्रिया पार पाडली. चेअरमन, व्हा.चेअरमन सर्व संचालकांचा अ‍ॅड. युवराज ठोंबरे, नारायण वाघ (गिधाडे), बबलू बेलदार (सांगवी), गुड्डू सनेर (ताजपुरी) यांनी पुष्पगुच्छ देवून सत्कार केला.