ग्राम आरोग्य शिबिरात ३५० च्यावर रुग्णांची तपासणी

0

जळगाव । वाढदिवसानिमीत्त नक्षराध्यक्ष सलीम पटेल यांनी ग्रामीण भागात आरोग्य जनजागृतीचा विडा उचलत रूग्णांना मोफत शिबिरातून लाभ मिळवून दिला हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. सलीम पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते त्या ठिकाणी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयातर्फे सूरू झालेल्या ग्राम आरोग्य शिबिरास पहूर, मस्कावद,पाळधी येथे प्रचंड प्रतिसाद मिळाला असून नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत केले होते. आज धरणगाव येथे नगराध्यक्ष सलीम पटेल यांच्या वाढदिवसानिमीत्त मोफत आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आले. यावेळी त्यांचे सोबत शिवसेना जिल्हाध्यक्ष गुलाबराव वाघ, धरणगाव नगराध्यक्ष सलीमभाई पटेल यांचेसह मान्यवर उपस्थीत होते.

आजारांवर केले मार्गदर्शन

कार्यक्रमाच्या सुरूवातीला मान्यवरांच्या असते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. शिबीरात 350 च्या वर रूग्णांनी तपासणी करून घेतली. या शिबिरात डॉ उल्हास पाटील वैद्यकिय रूग्णालयाचे एम एस,एम डी, तसेच स्त्रीरोग तज्ञ नागरिकांची तपासणी करतील. हर्निया,अपेन्डीक्स,पोटाच्या, आतडयांच्या, गर्भपिशवीच्या गाठी, कॅन्सर, प्रोस्टेट,मुतखडा, पित्ताशय खडा,लहान मुलांवरील शस्त्रक्रिया आदी आजारांची मोफत तपासणी करून उपचार विषयक मार्गदर्शन केले. यापैकी काही रूग्णांना शस्त्रक्रियेचा सल्ला देण्यात आला तर बाकीच्या रूग्णांना पुढील उपचार विषयक मार्गदर्शन करण्यात आले. शस्त्रक्रियेचा सल्ला दिलेल्या रूग्णांवर डॉ उल्हास पाटील वैद्यकिय रूग्णालयात राजीव गांधी योजनेअंतर्गत मोफत व ज्या शस्त्रक्रिया योजनेत येत नाही अशा अल्पदरात केल्या जाणार आहे.