ग्राम सडक योजनेंतर्गत रस्ता कामाचे उद्घाटन

0

अमळनेर । आमदार शिरीष चौधरी यांच्या प्रयत्नांतून महाराष्ट्र ग्रामिण रस्ते विकास कार्यक्रमांतर्गत मुख्यमंत्री ग्राम सडक योजने मार्फत मंजूर झालेल्या ग्रामिण रस्ता कामाचे भूमिपूजन शुक्रवार 12 रोजी आमदार शिरीष चौधरी यांच्याहस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हिरा उद्योग समूहाचे चेअरमन डॉ. रविंद्र चौधरी असतील. महाराष्ट्र ग्रामिण रस्ते विकास कार्यक्रमांतर्गत मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतर्गत मारवड, गोवर्धन, खेडी, वासरे ते शहापूर रस्ताचे खडीकरण, डांबरीकरण, जलनिस्सारणासह बांधकाम करण्यात येणार असून कामाची अंदाजीत किंमत 4 कोटी 21 लाख 79 हजार आहे. सदर कार्यक्रम शुक्रवारी सकाळी 9.30 वा. शहापूर ता अमळनेर येथे पार पडणार आहे. कार्यक्रमास परिसरातील गावांचे सरपंच, उपसरपंच, वि.का.सो. चेअरमन, संचालक, पोलीस पाटील, ग्रा.पं.सदस्य, ग्रामस्थ व आमदार शिरीषदादा मित्र परिवार आघाडीचे सर्व कार्यकर्ते उपस्थित राहणार असून उपस्थितीतीचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

गाव तेथे बसची संकल्पना
आमदार शिरिष चौधरी यांनी गाव तेथे पक्का रस्ता व गाव तेथे एस.टी. बस हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून यासाठी शासन दरबारी जोमाने पाठपुरावा केला यामुळे अनेक गावांना पक्के रस्ते होऊन त्या गावांचा शहराशी संपर्क वाढला आहे परिणामी शेतकरी बांधवांना शेतीपूरक व्यवसाय करण्यास चालना मिळत आहे. याच पद्धतीने तालुक्यातील इतर गावांच्या रस्त्याचे प्रस्ताव शासन दरबारी मंजुरीसाठी सादर झाले असून यात मारवड, गोवर्धन, खेडी, वासरे ते शहापूर रस्त्याच्या कामास मंजुरी मिळाली आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. परिसरातील अनेक गावांची यामुळे मोठी सोय होणार आहे.