एरंडोल। बँकेत येणारे सर्वसामान्य नागरिक, अशिक्षित खातेदार व शेतकरी यांच्या समस्या सोडवून त्यांचे कामे वेळेवर केल्यामुळे मानसिक समाधान मिळाले असे प्रतिपादन स्टेट बँकेचे व्यवस्थापक संजय गायकवाड यांनी केले. त्यांच्या निरोप समारंभा प्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. पोलीस निरीक्षक बाळासाहेब केदारे अध्यक्षस्थानी होते. यावेळी विविध संघटनांच्या वतीने गायकवाड यांना बैलजोडीची प्रतिकृती देवून सत्कार करण्यात आला.
यावेळी गायकवाड यांनी आपल्या तीन वर्षाच्या कारकिर्दीत सर्वसामान्य नागरिकांचे कामे केल्यामुळे मानसिक समाधान मिळाल्याचे सांगितले. तीन वर्षात ग्राहकांनी देखील सहकार्य केले. बँकेचे अधिकारी व खातेदार यांच्यात समन्वय असल्यास कोणतेही वाद निर्माण होत नाहीत.
खातेदारांनी देखील कर्मचार्यांना सहकार्य करावे असे आवाहन केले. यावेळी नगराध्यक्ष रमेश परदेशी, यशवंतराव चव्हाण, अमित पाटील, माजी नगराध्यक्ष किशोर निंबाळकर, सुरतचे उपमहापौर सुरेश सोनवणे, तालुका कृषी अधिकारी आर.एच.पाटील, प्रा.शिवाजीराव अहिरराव, समाधान पाटील, बाजार समितीचे माजी सभापती शालिग्राम गायकवाड, पोलीस निरीक्षक बाळासाहेब केदारे यांनी मनोगत व्यक्त केले. शिवसेनेचे विधानसभा क्षेत्र प्रमुख जगदीश पाटील यांनी सूत्रसंचलन केले. कार्यक्रमास ओम त्रिवेदी, उपनगराध्यक्ष जाहिरोद्दिन शेख कासम, अनिल चौधरी, युवा उद्योजक समाधान पाटील, बाजार समितीचे संचालक मिलिंद पवार, गोविंदा पाटील, राहुल पाटील यांच्यासह बँकेचे कर्मचारी, खातेदार, शेतकरी व राजकीय, सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी उपस्थित होते.