ग्राहकाच्या धनादेशाचा अनादर : भुसावळातील दोन्ही बँकांना जिल्हा ग्राहक आयोगाचा दणका

भुसावळ : ग्राहकाने कर्ज फेडण्यापोटी संबंधिताना दिलेला धनादेश वटवण्यात न आल्याने ग्राहकाने जिल्हा ग्राहक आयोगात दावा केला होता. या दाव्यात तथ्य आढळून आल्यानंतर भुसावळातील पंजाब नॅशनल बँकेसह आयसीआयसीआय बँकेला दहा हजार रुपये दंड व अर्जाचा खर्च पाच हजार रुपये देण्याचे आदेश दिल्यानंतर बँक प्रशासनाच्या गोटात खळबळ उडाली.

धनादेश न वटल्याने आयोगाकडे तक्रार
भुसावळातील पंजाब नॅशनल बँकेचे ग्राहक राजेंद्रसिंग मंचसिंग बुडवाल यांनी नयन अनिल अग्रवाल यांना घेतलेल्या कर्जापोटी आठ लाखांचा धनादेश 30 मार्च 2020 रोजीची तारीख टाकून दिला होता. राजेंद्रसिंग यांनी आपल्या आयसीआयसीआय बँकेत हा धनादेश 26 जून 2020 रोजी वटवण्यासाठी टाकल्यानंतर बँकेने 2 जुलै 2020 रोजी धनादेश मुदतीबाहेरचा असल्याचे कारण नमूद करीत त्याचा अनादर (बाऊन्स) केल्याने राजेंद्रसिंग यांना कर्जाची रक्कम मिळू शकली नाही. राजेंद्रसिंग यांनी या संदर्भात जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगापुढे दोन्ही बँकांविरोधात तक्रार दाखल केली. 10 जानेवारी 2022 रोजी आयोगाने दोन्ही बँकांना दहा हजार रुपये दंड व पाच हजार रुपये अर्जापोटी भरपाई देण्याचे आदेश दिले. ठेवीदारातर्फे अ‍ॅड.राजेश एस.उपाध्याय व अ‍ॅड.संजय तेलगोटे यांनी काम पाहिले.