मुक्ताईनगर- बहुतांश ठिकाणी ग्राहकांची मोठ्या प्रमाणात लूट होत असून ती थांबविण्यासाठी ग्राहकांचे प्रबोधन होणे गरजेचे आहे. त्यासाठी ग्राहक चळवळ ही लोक चळवळ व्हावी, असे आवाहन अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे जिल्हाध्यक्ष विकास महाजन यांनी मुक्ताईनगर येथे आयोजित ग्राहक पंचायत पदाधिकार्यांच्या बैठकीप्रसंगी केले. याप्रसंगी नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष नजमा ईरफान तडवी, मुख्याधिकारी श्याम गोसावी, ग्राहक पंचायतीचे जिल्हा कोषाध्यक्ष साहित्यिक अ.फ.भालेराव, ग्राहक पंचायतचे तालुका अध्यक्ष एन.जी.शेजोळे, तालुका संघटक छबीलदास पाटील, शिक्षक इरफान तडवी, मोहन मेढे, शरद बोदडे आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविक पाल्लिस पाटील मोहन मेढे यांनी केले. जिल्हा कोषाध्यक्ष तथा साहित्यिक अशोक फकीरा भालेराव यांनी ग्राहकांची स्थिती त्यांचे हक्क-अधिकार याविषयी विवेचन केले. सदस्य योगेश पाटील, तालुकाध्यक्ष एन.जी.शेजोळे यांनी ग्राहकांची होत असलेली लूट याबाबत मार्गदर्शन केले व ग्राहकांचे प्रबोधन होणे गरजेचे असल्याचे सांगितले.
मिनिमम रीटेल प्राईस छापण्याची सूचना करावी
मुक्ताईनगर नगरपंचायतचे मुख्याधिकारी श्याम गोसावी यांनी ग्राहकांच्या हक्कांबाबत जनजागृती करण्याचे महत्त्वाचे कार्य ग्राहक पंचायत करीत असून कोणत्याही वस्तूवर एम.आर.पी. छापलेले असते परंतु मिनिमम रिटेल प्राईस छापलेले नसते ती त्या प्रॉडक्टवर नोंद करण्यासाठी ग्राहक पंचायतीतर्फे प्रयत्न व्हावेत, अशी सूचनाही केली. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सदस्य लक्ष्मण चौके, योगेश पाटील, प्रा.डांगे, सचिन पाटील, धनंजय सापधरे, प्रमोद भालेराव, अरुण सवरणे, सुरेश पाटील, मोहन वाघे, निलेश मेढे, भैया भालेराव आदींनी परीश्रम घेतले. आभार छबीदास पाटील यांनी मानले.