जळगाव : भारतीय समाज निर्णायक वळणावर असतांना ग्राहक दृष्टी देण्याची संकल्पना करून ग्राहक दृष्टी हे मासिक सुरू होत आहे. हा क्रांताकारी निर्णय म्हणावा लागेल. ग्राहक चळवळीशी संबंध असलेला माहिती कायदा हे प्रभावी अस्त्र आहे, अणुशक्ती एवढीचा बाजारपेठांचाही दोन देशांवर प्रभाव असतांना माझ्या खरेदीतुन देशहित होते की नाही हि ’ग्राहक दृष्टी’ ग्राहकांमध्ये असणे आवश्यक आहे. त्यामुळे ’ग्राहक दृष्टी’ हा व्यापक अर्थ आहे. चंगळवादामुळे व्यक्तिला व्यक्तिपासून तोडण्याचे का सुरू आहे. अशा काळात तन, मन व धनाने वस्तु ग्रहण करतो तो ग्राहक, लहरपसश षेी ींहश लशीींंशी या प्रमाणे ’ग्राहक दृष्टी’चे अनेक पैलु आहेत, त्यामुळे हा निश्रि्चतच क्रांतीकारी कार्यक्रम ठरेल असे प्रतिपादन राज्य माहिती आयुक्त दिलीप धारूरकर यांनी केले. रामकृष्ण पब्लीकेशन्स् तर्फे आयोजित ’ग्राहक दृष्टी’ प्रकाशन व ’ग्राहक राजा पुरस्कार’ सोहळ्यात ते बोलत होते.
मान्यवरांच्या उपस्थित सत्कार
याप्रसंगी अध्यक्षस्थानी राज्य माहिती आयुक्त दिलीप धारूरकर, महापौर ललीत कोल्हे, कुलगुरू पी.पी.पाटील, ग्राहक पंचायत महाराष्ट्रांचे अध्यक्ष डॉ विजय लाड, ’रामकृष्ण पब्लीकेशन’चे अध्यक्ष अविनाश पात्रीकर, मुख्य संपादक श्यामकांत पात्रीकर, प्रबंध संचालक मनीष पात्रीकर आदी उपस्थित होते. ग्राहकाभिमुख कार्य करणार्या जितेंद्र पवार, समीर जैन, जय विजय निकम, भुषण पाटील, दिलीप चौबे, विजय मोहरीर आदी उपस्थित होते.
ई पेपरचे उद्घाटन
ग्राहक पंचायतीचे अधिष्ठान स्वामी विवेकानंद आणि प्रणेते बिंदू माधव जोशी यांना ग्राहक दृष्टी प्रकाशन सोहळ्याचा निश्रि्चतच आनंद होत असेल असे सांगून डॉ. लाड पुढे म्हणाले की, साधक साधना करता करता मोक्ष प्राप्त करून बिंदू माधव जोशींनी मुळाक्षरे सांगितली. ग्राहक, उत्पादक, कामगार, शेतकरी, व्यापारी हे ग्राहक पंचायतीचे पंचप्राण आहेत नी त्यामुळेच देशात कल्याणकारी अर्थव्यवस्था पुढे येऊ शकली. हे सर्व एकमेकांवर अवलंबून असून अर्थपुरूषाची कुंडलीनी आहेत. ’ग्राहक दृष्टी’ नवीन अर्थ रचना मांडून ग्राहक जागृतीचे फार मोठे काम करेल असा विश्वास मला आहे, यावेळी संचालक महेश पात्रीकर यांच्या संकल्पनेत तयार करण्यात आलेल्या ई पेपरचे उद्घाटन करण्यात आले.प्रस्ताविक मुख्य संपादक श्यामकांत पात्रीकर यांनी केले तर आभार प्रबंध संचालक मनीष अविनाश पात्रीकर यांनी मानले. मोनाली ढोक यांच्या पसायदानाने सोहळ्याचा सांगता झाली.