धुळे । मनमाड-इंदूर रेल्वेमार्गाचे येत्या चार – पाच महिन्यांत उद्घाटन होईल, या मार्गावरील सोनगीरला सर्व सुविधायुक्त भव्य रेल्वे स्थानक बनविण्यात येईल तसेच दिल्ली – मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर 2019 साठी धुळे जिल्ह्याची निवड झाली आहे व इंडस्ट्रीयल झोन हा सोनगीर ते नरडाणा दरम्यान असेल, असे प्रतिपादन संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी सोनगीर येथे शनिवारपासून दोन दिवसीय ग्राहक पंचायतीचे राज्यव्यापी मेळाव्याचे उदघाटन डॉ. भामरे यांचे हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
दोन दिवसीय ग्राहक पंचायत मेळावा
अध्यक्षस्थानी राज्य ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष डॉ. विजय लाड होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे अरविंद जाधव, राज्य संघटक सर्जेराव जाधव, नाशिक विभागीय अध्यक्ष मार्तंडराव जोशी, विभागीय संघटक अरुण भार्गवे, सहसंघटक डॉ. योगेश सुर्यवंशी, मा. महापौर मंजुळा गावित, पंचायत समितीचे माजी सदस्य अविनाश महाजन, उपसरपंच धनंजय कासार, राज्य सचिव अर्जुन वाघमारे, वसंत देशमुख, राज्य सहसंघटक मेघा कुलकर्णी. प्रकाश पाठक, अनिल जोशी, पवन अग्रवाल, डॉ विजय लाड, सुरेश वाघ, राज्यभरातील कार्यकर्ते उपस्थित होते. डॉ. भामरे यांच्या हस्ते ग्राहक पंचायतीचे मानचिन्हाचे तसेच ग्राहक पंचायतीचे मुखपत्र ग्राहकतीर्थच्या प्रथम अंकाचे प्रकाशन झाले. संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे म्हणालेे की तापी-जामफळ- कनोली प्रकल्पासाठी 2360 कोटी रुपये मंजूर झाले असून लवकरच कामाला सुरुवात होणार आहे. ग्राहकांत जागृती नसल्याने व ते संघटीत नसल्याने त्यांची लुबाडणूक होते. अशा ग्राहकांना न्याय मिळवून देण्याचे महान कार्य ग्राहक पंचायत करीत आहे.