ग्राहक संरक्षण परिषदेच्या वतीने पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांचा सत्कार

0
मोहोळ (सोलापूर )  : पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांचा शासकीय कमिटीवर काम करणाऱ्या शिष्टमंडळाच्या वतीने  नुकताच  पोलीस अधिक्षक मुख्यालय ग्रामीण सोलापूर येथे संपन्न झालेल्या बैठकी प्रसंगी ‘पुष्पगुच्छ ‘ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.  उत्सव काळात ‘कायदा शांतता सुव्यवस्था व माँब लिचिंग ‘ या सबंधी घेण्यात आलेल्या सोलापूर येथील आयोजित बैठकीच्या प्रसंगी त्यांचा मोहोळ शहर व तालुक्यांच्या वतीने शिष्टमंडळानी यथोचित सत्कार करण्यात आला याप्रसंगी सोलापूर जिल्हयांतील पोलीस पाटील,  शांतता कमिटी सदस्य, दक्षता कमिटी सदस्य, एस.पी. हन्डरेंट मेंबर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या शिष्टमंडळामध्ये ग्राहक संरक्षण परिषद जिल्हा सदस्य तथा पॅरा लिगल व्हॉलंटिअर राजन घाडगे, मा.मोहोळ तालुका भ्रष्टाचार निर्मुलन समिती सदस्या यशोदा कांबळे, मल्हारी वाघमारे पोलीस- पाटील – विरवडे खुर्द, काशीनाथ कांबळे पोलीस पाटील – पोफळी, कांता गुंड हिवरे  आदी मान्यवरच्या शुभहस्तेे करण्यात आला.