जळगाव । जिल्ह्यात होणार्या ग्रामपंचायत निवडणुका होवूनही कर्मचार्यांचा त्या दिवसाचा भत्ता अद्याप अदा करण्यात आलेला नाही. ऑगस्ट ते ऑक्टोबर 2015 दरम्यान झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणूक पार पडल्या होत्या. मतदान दिनी शासकीय कर्मचारी यांची उपस्थिती देवून मतदान केंद्रांवर आपली हजेरी दिली होती. त्यानंतरही ग्रामपंचायतीच्या निवडणूका झाल्या मात्र त्यांचा त्या दिवसाचा भत्ता, छापाई, अधिग्रहित वाहने, इंधन खर्च, कागदपत्रे, झेरॉक्स, इतर खर्च दिलेला नाही अशी माहिती समोर आली आहे. अद्यापर्यंत जिल्हयाला 1 कोटी 4 लाख 18 हजार अनूदान प्राप्त झाले आहे. त्याचेही पुर्णपणे वितरण करण्यात आले आहे. तर 1 कोटी 40 लाख 59 हजार 581 रक्कम शासनाकडून येण्याची बाकी आहे. जिल्ह्यात 3.50 कोटी रूपयांची मागणी होती त्यापैकी 2 कोटी 55 लाख 98 हजार रूपये कर्मचार्यांचे मानधन अदा करण्यात आले आहे.