ग्रा.पं. बांधकामासाठी 2.45 कोटीचा निधी मंजूर

0

अमळनेर । तालुक्यातील अनेक ग्रामपंचायत इमारतीची अतिशय जीर्ण अवस्था झाली असताना या पंचायतीचे रंगरूप बदलविण्याचा संकल्प आमदार शिरीष चौधरी यांनी घेतला असुन यासाठी ग्रा.प.च्या नविन इमारतीसाठी तब्बल 2 कोटी 45 लाख एवढा भरघोस निधी ग्रा.प. ग्रामविकास कार्यक्रम अंतर्गत उपलब्ध झाला आहे. सदर निधीतून तीन प्रमुख रस्त्यासह करणखेडा सभागृहाचे काम मार्गी लागणार असून सोबत 19 ग्रा.प.च्या नविन व अघावत इमारती प्रत्येकी 10 लाख रुपये खर्चातून उभ्या राहणार आहे. सदर निधी बांधकाम विभागाकडे उपलब्धही झाला असल्याने टेंडर प्रक्रीयेला लागलीच कामांना सुरुवात होईल, अशी माहिती आमदार शिरीष चौधरी यांनी दिली आहे.

आमदार शिरीष चौधरी यांनी केला पाठपुरावा
हिरा उद्योग समूहाचे चेअरमन डॉ. रविद्र चौधरी यांच्या मार्गदर्शनाने आमदार शिरीष चौधरी याच्या निदर्शनास आणून दिल्याने आमदारांनी शासन दरबारी प्रस्ताव सादर करून पाठपुरावा केला. अखेर त्यांच्या प्रयत्नला यश येवून पहिल्या टप्यात 19 ग्रामपंचायतीसाठी प्रत्येकी 10 लाख याप्रमाणे निधी प्राप्त झाला आहे. तसेच लोण ते वावडे रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे (15 लाख )धानोरा ते मारवड रस्ता मजबुतीकरण करणे (19.94 लाख) या प्रमाणे निधीची तरतूद झाली आहे. याशिवाय ग्रामीण विकास अंतर्गत शासनाच्या बजेटमध्ये गलावडे-चौबारी-पाडसे या रस्त्याचे मजबुतीकरण रुदीकरण व मलनिस्सारण कामे करणे यासाठी तब्बल 90 लाखांचा निधी मंजूर झाला आहे.

या गावांना झाला निधी मंजूर
रस्ते ग्रामीण, भागासाठी अतिशय महत्वपूर्ण असुन यामुळे अनेक गावे व्यवहारीक दृष्टीतून एकमेकांना जोडण्यास मदतच होणार यामुळे ग्रामस्थामध्ये समाधानाची भावना असुन नव्या पिढीला आपल्या गावाची पंचायत नवीन स्वरुपात पाहायला मिळणार आहे. टप्प्याटप्प्यात सर्व ग्रा. प इमारती नव्या रुपात उभ्या राहतील असा संकल्प आमदार चौधरी व डॉ. रविद्र चौधरी यांनी व्यक्त केला आहे एकंदरीत तालुक्याचे स्वरूप बदलताना दिसत असल्याचे त्याची सर्वत्र कौतुक होत आहे. नवीन इमारती होणार्‍या ग्रामपंचायतीत ग्रामविकास कार्यक्रम अंतर्गत तालुक्यतील खोकरपाट, जुनोने, एकरुखी, खेडी व्यवहारदळे, पिंगळवाडे, सावखेडा, कामतवाडी, रुधाटी, जैतपीर, चौबारी, खेडी, पडसे, कळबु, अंचलवाडी, धानोरा, कळमसरे, करणखेडा व हिगोने आदी गावांसाठी हा निधी मंजूर झाला आहे.