पुणे । एका 22 वर्षीय तरुणीने हृदय व फुफ्फुसाचे अवयव दान केले असून ग्रीन कॉरिडोअरच्या माध्यमातून दोन रुग्णांना जीवनदान मिळाले आहे.
बावीस वर्षीय तरुणी काही दिवसांपूर्वी उंचावरून खाली पडली. त्यावेळी तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. उपचारासाठी तिला रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले. बुधवारी तिचा मृत्यू झाला. रुग्णालयाकडून तिच्या कुटुंबाला अवयव दानाची कल्पना दिली असता, त्यांनी अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. रुबीमध्ये रात्री 1 वाजून 4 मिनिटांनी या तरुणीचे हृदय मुबंई येथील मुलुंड परिसरातील मुलुंड फोरर्टीस या रुग्णालयात ग्रीन कॉरिडोअरच्या माध्यमातून पहाटे 3 वाजून 30 मिनिटांत पोहचले. तर तरुणीचे फुफ्फुस बुधवारी रात्री 11 वाजता रुबी हॉल क्लिनिकमधून ग्रीन कॉरिडोअरच्या माध्यमातून पहाटे 3 वाजता चेन्नई येथील ग्लोबल चेन्नई या हॉस्पिटलमध्ये पोहचले. तेथे तरुणीचे फुफ्फुस एका 63 वर्षीय महिलेवर प्रत्यारोपित करण्यात आले.