भुसावळ । प्रदुषणमुक्त भुसावळ व आयडीयल ग्रीन भुसावल सिटी निर्मितीसाठी आपण सर्वांनी एकत्र येवून एक सामाजिक दायीत्व व कर्तव्यपूर्ती करुया, असे आवाहन मुक्ताईनगर वनपरिक्षेत्राचे वनअधिकारी प्रकाश वराडे यांनी केले. शुक्रवार 30 रोजी वृक्षलागवड, संगोपन व संवर्धन महारॅलीच्या समारोपानंतर डी.एस. हायस्कूलमध्ये सकाळी 10.30 वाजता भुसावळ शहर व परिसरातील पर्यावरणवादी व निसर्गप्रेमी तसेच सर्व सामाजिक संस्था, प्रतिनिधी यांना भुसावळ शहर परिसरात वृक्षलागवड तसेच त्यांचे संगोपन, संवर्धन या विषयावर चर्चा, विनिमय व नियोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन साई निर्मल फाऊंडेशनचे अध्यक्ष शिशिर जावळे यांनी केले होते. यावेळी मुक्ताईनगर वनपरिक्षेत्राचे वनअधिकारी प्रकाश वराडे यांनी वृक्षलागवड मोहिमेत सर्वांनी उत्स्फुर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन केले.