ग्लोबल टॅलेंट इंटरनॅशनल स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन

0

चिखली : शालेय स्तरावरील अशा प्रदर्शनातून विद्यार्थ्यांना विज्ञानाची गोडी लागते. त्यामुळे विज्ञानातील गंमती जंमती कळतात. त्यातूनच त्यांना विज्ञानाचे शिक्षण घेण्याची जिद्द निर्माण होते. जागतिक पातळीवरील संशोधक तयार झाले पाहिजेत. प्रीतम मेडिकल फाउंडेशन संचलित स्पाइन रोड येथील ग्लोबल टॅलेंट इंटरनॅशनल स्कूलच्यावतीने जागतिक विज्ञान दिनानिमित्ताने आयोजित केलेल्या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन संगीतकार नंदीन सरीनांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी शाळेचे ग्लोबल टॅलेंट इंटरनॅशनल स्कूलचे अध्यक्ष डॉ. ललित धोका, किशोरी सरीन, मुख्याध्यापिका माधुरी येसुगडे आदी उपस्थित होते. 120 विद्यार्थ्यांनी आपले वैज्ञानिक प्रकल्प सादर करून आपल्या बुद्धी कौशल्य दाखवले. तर सुमारे दोनशे पालकांनी प्रदर्शनास हजेरी लावली.

विज्ञानाची आवड निर्माण होते
डॉ. धोका म्हणाले की, मुलांना विज्ञान विषयी आवड निर्माण व्हावी. त्यांच्यातील वैज्ञानिक दृष्टीला चालना मिळावी या हेतूने या प्रदर्शनाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन भारती गडद तर आभार व्यवस्थापिका डॉ. स्वप्नाली धोका यांनी मानले. यावेळी विद्यार्थ्यांनी सोलर प्रकल्प, जलशुद्धीकरण, प्राणी व पक्षाचे प्रकार, वाहतूक व वाहतुकीचे नियम, टाकाऊ पासून टिकाऊ असे प्रकल्प तयार केले होते. या प्रदर्शनात प्ले ग्रूप ते चौथी पर्यंतचे विद्यार्थी सहभागी झाले होते.