‘ग.स.’ तील बेनामी ठेवप्रकरण म्हणजे विरोधकाची स्टंटबाजी

0

संचालकांचा पत्रकार परिषदेत माहिती ; नोकर, इमारत विक्रीबाबतचे झालेले आरोप बिनबुडाचे ;

जळगाव:- जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची पतपेढी म्हणजे ग.स. सोसायटीत किरण भीमराव पाटील यांच्या नावाने 50 लाख रुपयांच्या ठेवी प्रकरणी औरंगाबाद खंडपीठाने तत्कालीन संचालकावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहे. बेनामी ठेव प्रकरण म्हणजेच विरोधकांची स्टंटबाजी असल्याचा आश्‍चर्यजनक आरोप ग.स.च्या संचालकांनी रविवारी पत्रकार परिषदेत केला. यावेळी संचालकांनी बेनामी ठेव ठेवली होती त्या बाबत संस्थेने चौकशी करून संबधितांवर कारवाई केली असून आता किरण पाटील याच्याकडे एवढी संपत्ती नेमकी आली कुठून याचीही आयकर विभागाने चौकशी करावी, असे संचालकांनी सांगितले.

ग.स ची बदनामी केली
नोटबंदीच्या काळात ग.स. सोसायटीतील सहकार गटाचे नेते बी.बी.पाटील यांचा मुलगा किरण पाटील याने नातलगांच्या नावाने 50 लाख रुपयांच्या बेनामी ठेवी ठेवण्यात आल्याने रावसाहेब पाटील यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. त्या प्रकरणी न्यायलयाने संचालकावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. या प्रकरणी योग्य ती चौकशी करून कारवाई केली जाईल असेही संचालकांनी सांगितले. 50 लाख रुपये कुणाचे आहे याची विरोधकांना जाणीव असताना त्यांनी लाचलुचपतप्रतिबंधक खात्याकडे व उच्च न्यायालयात याचिका दाखल करत संचालक मंडळ व संस्थेची बदनामी केला असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या प्रकरणात जो कर्मचारी दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई केली जाणार असल्याची माहिती आज सांगितली. किरण कडे इतके पैसे कुठून आले याची चौकशी करण्याचा अधिकार इन्कमटॅक्स ला आहे. त्यांनी ती चौकशी करावी असेही त्यांनी या वेळी सांगितले.

इमारत विक्री, नोकर भरती बाबत खुलासा
नोकर भरती ही उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रता, अनुभव, मुलाखतीवरून करण्यात आली आहे. मात्र याबाबत विरोधकांनी सहकार खाते तसेच सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालयात, याचिका दाखल केल्या आहेत. त्या न्यायालयाने फेटाळल्या आहेत. अमळनेर येथील संस्थेची इमारत ही टेंडर प्रकिया राबवून विक्री केली असल्याचा खुलासा संचालकांनी पत्रकार परिषदेत केला. विरोधकांचे आरोप बिनबुडाचे असून त्यांच्याकडे तो अहवाल आहे अशी माहितीही संचालकांनी दिली. नोकर भरतीची प्रकरणाची चौकशी सहकार खात्यामार्फत चालू आहे या बाबत भाष्य करणे चुकीचे ठरेल असे सांगितले. पत्रकार परिषदेला लोकसहकार गटाचे गटनेते तुकाराम बोरोले, संस्थेचे अध्यक्ष मनोज पाटील, उपाध्यक्ष शामकांत भदाणेे, संचालक विलास नेरकर, नथ्थु पाटील, सुनिल निंबा पाटील, सुनील पाटील, अनिल गायकवाड, , विश्‍वास सुर्यवंशी, यशवंत सपकाळे, सुभाष जाधव, तज्ञ संचालक संजय पाटील, दिलीप चांगरे उपस्थित होते.