ग.स.सोसायटीच्या रिक्त जागेवर निवडणूक होणार

0

जळगाव । नोटाबंदीच्या काळात चलनातील बाद नोटा बदली प्रकरणी अन्वेषण विभागातर्फे सुरु असलेल्या चौकशीच्या रडावर असलेले जिल्हा परिषदेतील कक्षाधिकारी ग.स.चे माजी चेअरमन सुनिल सुर्यवंशी यांनी ग.स.संचालक पदाचा राजीनामा दिला. त्यांनी राजीनामा दिल्यामुळे संचालक मंडळातील एक जागा रिक्त झाली आहे.

या रिक्त जागेवर सहकार विभागातर्फे निवडणुक होणार आहे. गेल्या पंचवार्षीक निवडणुकीला अडीच वर्षे पुर्ण झाली आहे. अद्याप नविन निवडणुकीला अडीच वर्षाचा कालावधी बाकी आहे. सुर्यवंशी यांची सीबीआय चौकशी सुरु असल्याने त्यांनी ग.स.सोसायटीच्या प्रतिमा डांगाळू नये म्हणून राजीरामा द्यावा यासाठी दबाव आणण्यात आला होता. त्यानंतर त्यांनी पदाचा राजीनामा दिला. संचालक मंडळाने मंजूर केलेला राजीनामा दोन दिवसांपार्वी जिल्हा उपनिबंधकांना प्राप्त झाला तो मंजूर करुन रिक्त झालेल्या संचालक पदाच्या निनवडणुकीबाबतच्या तरतुदी तपासून पाहिल्या जात आहे.