ग.स.सोसायटीच्या स्विकृत संचालकपदी भोईटे

0

चोपडा : जळगांव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढीच्या स्विकृत संचालक म्हणून येथील मॉडर्न गर्ल्स स्कूलचे माध्यमिक शिक्षक तथा चोपडा तालुका माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष मंगेश रमेश भोईटे यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती सहकार गटाचे अध्यक्ष बी.बी.पाटील यांनी दिली. या बाबत ग.स.चे संचालक देवेंद्र पाटील यांनी मंगेश भोईटे यांचे नाव सुचविले होते. त्यानुसार 24 डिसेंबर रोजी जळगाव येथे ग.स.सोसायटीच्या सभागृहात अध्यक्ष तुकाराम बोरोले, उपाध्यक्ष महेश पाटील, माजी अध्यक्ष सुनिल सूर्यवंशी, संचालक देवेंद्र पाटील, माध्यमिक पतपेढी चे माजी अध्यक्ष आर.एच. बाविस्कर आदी उपस्थित होते. मंगेश भोईटे यांची स्विकृत संचालक म्हणून निवड झाल्यानंतर माध्यमिक पतपेढीचे संचालक आर.एल. बाविस्कर, सेवानिवृत्त शिक्षक लक्ष्मण भदाणे, नंदू देशमुख , शाखा अभियंता पि बी पाटील, विलास शिंदे, प्रा.एम.आर.काटे, नंदकिशोर सोनवने, अनिल माळी, बंसीलाल पाटील, प्रा. अविनाश पाटील यांनी त्यांचा सत्कार केला.