ग.स.सोसायटीतर्फे गुणवंतांचा गुणगौरव

0

एरंडोल। जळगाव जिल्हा सरकारी नौकरांची सहकारी पतसंस्थेच्या वतीने माध्यमिक शालांत परीक्षेत नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळविणार्‍या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. पंचायत समितीच्या आवारात बिडीओ स्नेहा कुडचे व गटशिक्षणाधिकारी एन.एफ.चौधरी यांच्याहस्ते पंचायत समितीच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. वृक्ष लागवडीनंतर त्यास तारेचे कुंपण घालण्यात आले. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी संस्थेच्या वतीने जिल्ह्यात वृक्षारोपण व त्यांचे संवर्धन हा उपक्रम राबविण्यात आल्याचे स्थानिक संचालक भाईदास पाटील यांनी सांगितले. बिडीओ स्नेहा कुडचे यांनी सर्व नागरिकांनी वृक्ष लागवड उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेच्या कर्मचार्‍यांनी सहकार्य केले.

कार्यक्रमास यांची होती उपस्थिती
संस्थेच्या वतीने सभासदांच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गटशिक्षणाधिकारी एन.एफ.चौधरी, माजी अध्यक्ष उत्तमराव पाटील, स्थानिक संचालक भाईदास पाटील यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी पुलकेशी केदार, राजेंद्र शिंदे, वाय.बी.पाटील, प्रमोद सोनवणे, चंद्रकांत महाले, प्रदीप नारखेडे, हेमराज बडगुजर, निरंजन सोनवणे, राजेंद्र पवार, प्रेमलाल पाटील, शब्बीर जनाब, संस्थेचे विभागीय अधिकारी अनिल पाटील, शाखाधिकारी शशिकांत बिरारी, संजय भदाणे यांचेसह सभासद, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.