जैन श्रावक संघातर्फे आयोजित कार्यक्रमाला समाज बांधवांचा प्रतिसाद
पिंपरी चिंचवड : येथील कल्याण प्रतिष्ठानमध्ये चिंचवडगाव जैन श्रावक संघातर्फे आयोजित घंटाकर्ण महावीर अनुष्ठान कार्यक्रमाला जैन बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमात 300 पेक्षा जास्त दाम्पत्य आणि साधक-साधिकांनी सहभाग घेतला. साध्वी डॉ. चंदनाजी, डॉ. अक्षयज्योतीजी यांच्या सान्निध्यात कार्यक्रम पार पडला. अनुष्ठानात रजतयंत्र, माळा आणि महाप्रसादाची व्यवस्था कुसुम भंडारी कुटुंबीयांतर्फे करण्यात आली.
सीमेवरील जवानांसाठी दिवाळी फराळ…
चिंचवडगाव जैन श्रावक संघातर्फे भंडारी कुटुंबीयांचा सन्मान करण्यात आला. वीर विशाल संघातर्फे सीमेवर लढणार्या जवानांसाठी दिवाळी फराळाचे 300 पॅकेट पाठविण्यात आले. प्रेरणा संस्थेचे त्यासाठी सहकार्य मिळाले. तर, भारतीय जैन संघटनेतर्फे गरीब मुलांना दिवाळी फराळ देण्यात आला. साध्वी डॉ. चंदनाजी म्हणाल्या,’’कोणतेही अनुष्ठान हे श्रद्धा आणि भक्तिभावाने करणे आवश्यक आहे. त्या माध्यमातून जीवनात विविध पातळ्यांवर यश मिळते. आपण गुरुला नम्र भावनेने नमस्कार केला तर आशीर्वाद रूपाने त्याचे चांगले फळ मिळते.’’