प्रत्येकी 15 हजार रुपये महापालिका प्रशासन देणार
पिंपरी-चिंचवड : महापालिकेचे घंटागाडी कर्मचारी आणि महापालिका शाळांतील सफाई कर्मचार्यांची यंदाची दिवाळी गोड होणार आहे. घंटागाडी कर्मचारी आणि तुटपुंज्या वेतनावर महापालिका शाळांच्या साफसफाईचे काम करणार्या कर्मचार्यांना महापालिका प्रशासन 15 हजार रुपये सानुग्रह अनुदान देणार आहे. स्थायी समितीने हा निर्णय घेतला आहे.
ऐनवेळचा प्रस्ताव मंजूर
महापालिकेच्या घंटागाडी कर्मचार्यांना वेतन कमी आहे. त्यांना दिवाळीमध्ये बोनस दिला जात नाही. दरवर्षी दिवाळीला त्यांना सानुग्रह अनुदान दिले जाते. यंदाही 15 हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान दिले जाणार आहे. महापालिका शाळांतील सफाई कर्मचार्यांना महापालिका केवळ दोन हजार रुपये वेतन देते. त्यांना शासनाच्या नियमानुसार पगार देण्यात येणार आहे. या कर्मचार्यांनादेखील दिवाळीसाठी 15 हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे. त्याबाबतचा ऐनवेळचा प्रस्ताव स्थायी सभेत मंजूर करण्यात आला.