घंटागाड्यांवर जीपीएस यंत्रणा कार्यान्वित !

0

आरोग्य विभागात कंट्रोल युनिट; निश्तिच केलेल्या रुटवर नियंत्रण

जळगाव: शहरातील कचरा संकलनासाठी मनपाने वॉटरग्रेस कंपनीला ठेका दिला आहे.तसेच मनपाने खरेदी केलेल्या 85 घंटागाड्या मक्तेदाराला भाड्याने दिल्या आहेत.परंतु कचरा संकलनासाठी घंटागाड्या फिरत नसल्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाल्याने 85 घंटागाड्यांवर जीपीएस यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असून कंट्रोल युनिट मनपाच्या आरोग्य विभागात आहे.त्यामुळे आता निश्तिच केलेल्या रुटवर नियंत्रण राहणार आहे.

महापालिकेने शहरात दैनंदिन स्वच्छतेसाठी एकमुस्त ठेका नाशिक येथील वॉटर ग्रेस कंपनीला दिला आहे. गेल्या चार महिन्यापांसून शहरात मक्तेदाराकडून सफाईचे काम सुरू आहे. परंतू मक्तेदाराच्या कामांवरून ओरड होणे ते कर्मचार्‍यांचे पगार न देण्यावरून अनेक वाद या सफाईच्या ठेक्याच्या संदर्भात झाले. त्यात महापालिका व मक्तेदार यांच्या झालेल्या स्वच्छतेच्या करारानाम्यात घंटागाड्यावर जीपीएस यंत्रणा बसविण्याचा करार झाला होता. त्यानुसार वॉटर ग्रेस कंपनीने सर्व 85 घंटागाड्यावर जीपीएस यंत्रणा बसवली असून गेल्या आठ दिवसापासून ती कार्यान्वीत करण्यात आली आहे.

जीपीएस यंत्रणेद्वारे नजर
घनकचरा प्रकल्प अंतर्गत महापालिकेने शहरातील दैनंदिन कचरा घराघरातू संकलनासाठी जीएम पोर्टलवरून 85 घंटागाड्या खरेदी केलेल्या आहे. या गाड्या सफाई मक्तेदाराला भाड्याने दिल्या आहे. प्रत्येक घंटागाडीचा प्रभागानूसार रुट ठरविला असून त्या रुटनूसार कचरा संकलनाचे काम वेळेत होते का याचे जीपीएस यंत्रणेद्वारे लक्ष ठेवले जात आहे.

घंटागाड्यांचा दैनंदिन अहवाल
महापालिकेच्या आरोग्य विभागात जीपीएस यंत्रणेचे कंट्रोल रुम ठेवण्यात आले आहे. यात मक्तेदाराचा तांत्रिक काम पाहणारा कर्मचारी व महापालिकेचा कर्मचारी पाहत आहे. यात सर्व गाड्या वेळेत दिलेल्या रुट नुसार जात आहे, का. वाहन कुठे किती वेळ थांबले याचा सर्वत तांत्रिक अहवाल दररोज केला जात आहे.