घटनेच्या तत्वानुसार समान नागरी कायदा लागू करा

0

भुसावळ। देशाला स्वातंत्र्य मिळून 70 वर्षे पुर्ण झाली. परंतु राज्य घटनेच्या तत्वानुसार एकता, समानता, स्वातंत्र्य व एकात्मता राष्ट्रवाद हे तत्व मान्य केले. म्हणून सर्वांना एकच कायदा लागू करण्याची मागणी हिंदू एकता आंदोलन पक्षातर्फे करण्यात आली आहे. यासंदर्भात प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर यांना सोमवार 17 रोजी निवेदन देण्यात आले.

जीएसटी प्रमाणे सर्वांसाठी एक कायदा हवा
देशात ज्याप्रमाणे एक देश, एक कर जीएसटी कायदा लागू केला त्याच पध्दतीने देशातील जातीयवाद लोकसंख्यावाद, बेकारी आणि दारिद्र्यावर एकमेव उपाय म्हणजे समान नागरि कायदा होय. प्रत्येक धर्माला वेगळ्या कायद्यामुळे विषमता निर्माण होऊन राष्ट्रीय ऐक्याला बाधा पोहचते. राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कलम 44 मध्ये काळानुरुप समान नागरि कायदा नमूद केले म्हणून त्वरीत समान नागरि कायदा लागू करा अशी मागणी करण्यात आली. याप्रसंगी नारायण कदम, सुदर्शन शितोळे, कैलास यंदे, अनिल देवकर, राजेंद्र जाधव, मिलन महाजन, निलेश पाठक, महेश जाधव, संजय हिरवे, पवन भोसले, विशाल देवकर उपस्थित होते.