भुसावळ– भोरगाव लेवा पंचायतीच्या भुसावळ शाखेतर्फे रविवार, 1 एप्रिल 2018 रोजी समाजातील घटस्फोटित, विधवा, विधूर, प्रौढ, अपंग, व्यावसायीक, शेतकरी-शेतमजूर वधू-वरांचा परीचय मेळावा शहरातील संतोषीमाता सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. समाजातील मान्यवरांसह लोकप्रतिनिधी या मेळाव्यास उपस्थित राहणार असून नावनोंदणीसाठी डॉ.बाळू पाटील, पुरुषोत्तम मेडीकल, जामनेर रोड, मामा पाचपांडे पान सेंटर, पांडुरंग टॉकीजसमोर येथे संपर्क साधावा, असे आवाहन चेअरमन सुभाष चौधरी व सचिव बाळू पाटील यांनी केले.