पवार व ठाकरे यांची आघाडी,भाजपाच्या अडचणी वाढल्या
बापु जगदाळे
पिंपरी : येणा-या निवडणुकीत राज्यात घडयाळ्याच्या अचूक ठेक्यावर मनसेचे इंजिनधावणार असल्याचे बोलले जात आहे. त्यासाठी शरद पवार यांनी राज ठाकरे यांना देखील कानमंत्र दिला आहे. राज ठाकरे देखील शरद पवार यांच्या बरोबर जाण्यास उत्सुक असून याला फक्त काही प्रमाणात कॉंग्रेस आयचाच अडसर निर्माण होण्याची शक्यता दिसत आहे. यामुळे राज्यात आघाडीत स्वाभिमानी शेतकरी संघठने बरोबरच शेतकरी कामगार पक्ष व मनसे अशी नवी आघाडी तयार होण्याची शक्यता राजकीय जाणकारांनी वर्तवली आहे. यामुळे युतीच्या अडचणीत वाढ होण्याची दाट शक्यता आहे.
नुकताच राजस्थान,मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्यात भाजपाचा झालेला पराभवामुळे भाजप देशात बॅक फुटवर गेली आहे. त्यामुळे भाजपाच्या गोठात चिंतेचे वातावरण असतानाच आता शरद पवार यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना आपल्या तंबुत घेतल्याने राज्यात शिवसेना व भाजप यांच्यात मात्र कमालीची अस्वस्थता वाढली आहे. यामुळे येणा-या निवडणुकीत ही आघाडी निश्चितच ऱंग भरेल यात शंका नाही.
नुकताच पुण्यात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार व मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ठरवून भेटीचा कार्यक्रम झाला होता. या मध्ये शरद पवार यांनी आपल्या राजकीय अनुभवाच्या शरदाचं चांदण्याचा पाऊस पाडत राज ठाकरे यांना ओले चिंब करत आपल्या बाजूने वळवण्यात यश आले असल्याचे बोलले जात आहे. राज ठाकरे यांनी जर राष्ट्र्वादीला साथ दिली तर ठाकरे यांना मुंबई,नाशिक, औरंगाबाद,पुणे व ठाणे परिसरातील विधानसभेच्या व लोकसभेच्या काही जागा सोडण्यात येणार आहेत. या मध्ये पुण्यातील खडकवासला, कोथरुड, हडपसर व जुन्नर च्या जागेचा देखील समावेश आहे. तर शिरुर लोकसभेच्या जागेचा देखील समावेश असण्याची शक्यता आहे. कारण मनसे कडून मंगलदास बांदल विद्यमान खासदार आढळराव पाटील यांच्या विरोधात मैदानात उतरण्यास तयार आहेत. तशी इच्छा देखील बांदल यांनी राज ठाकरे यांच्याकडे बोलून दाखवली आहे. या समीकरणांच्या धर्तीवरच सध्या राज ठाकरे यांनी राज्यातील महत्वाचे जिल्हे पिंजूऩ काढण्यात सुरवात केली आहे. याला नागरीकांचा देखील प्रचंड प्रतिसाद देखील मिळत आहे.
मनसे राष्ट्रवादीत गेला तर राष्ट्रवादी, कॉग्रेस आय. स्वाभिमानि शेतकरी संघठऩा, शेतकरी कामगार पक्ष अशी नविन आघाडी राज्यात प्रथमच पाहिला मिळणार आहे. पन मनसेच्या प्रवेशाने कॉग्रेस आयच्या पोटात मात्र गोळा येण्याची शक्यता आहे. मात्र या आघाडीबाबत अद्य़ापही कोणतीच घोषणा दोन्ही पक्षाकडून करण्यात आली नसली तरी असा काही निर्णय झाल्यास नवल वाटणार ऩाही.
मनसेला हाव्यात 35 जागा
या आघाडीत सामिल होण्यासाठी मनसेला विधानसभेच्या 35 जागा तर लोकसभेच्या 5 जागा हाव्या आहेत. पण मनसेची ताकद पाहता मनसेला 25 ते 30 जागा मिळू शकतात. या मध्ये सर्वात जास्त मुंबईंतील जागांचा समावेश असेल. कारण चाणक्ष शरद पवार यांनी मुंबई व आसपासच्या शहरी भागात राष्ट्रवादीचा कमी असलेला प्रभाव व मनसेची ताकद याची गोळाबेरीज केल्यास विधानसभेच्या 60 व लोकसभेच्या 8 जागेवर युतीला अडचणीत आणु शकु याची अटकल पुर्वीच बांधली आहे. यामुळे शिवसेने बरोबरच भाजप देखील येणा-या निवडणुकीत मोठ्या कोंढीत सापडू शकतो हे मात्र नक्की.