घणसोलीकरांना मिळणार महावितरण उपकेंद्र

0

नेरुळ : नवी मुंबईतील घणसोली,तळवली गाव, गोठवली गाव, राबाडा गाव विभागात सतत वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडत आहेत. यासाठी नागरिकांच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. यासाठी ऐरोली विभागाचे आमदार संदीप नाईक यांनी याबाबत ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे लेखी पत्राद्वारे महावितरण उपकेंद्र बसविण्यात यावे. अशी मागणी केली होती. याला ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन या विभागात स्वतंत्र उपकेंद्र सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे.

विजेची मागणी वाढू लागली
आपल्या पत्रात आमदार नाईक यांनी पुढील समस्या मंडळी होती की, घणसोली व आजूबाजूचा परिसर झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे येथील विजेची मागणी वाढू लागली आहे. घणसोली फिडर ची लांबी 14 किलोमीटर असून त्यामुळे अतिरिक्त लोड वाढून नागरिकांना वीज पुरवठा खंडित होण्याच्या समस्येस सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे स्वतंत्र उपकेंद्र या विभागासाठी द्यावे आहि मागणी आमदार नाईक यांनी उर्जामंत्र्यांकडे केली होती. या मागणीला तसेच पाठपुराव्याला यश आले असून लवकरच घणसोलीकारांची विजेची समस्या दूर होणार आहे.

नागरिकांची समस्या दूर
याबाबत ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी आमदार नाईक यांना पत्राद्वारे कळवले आहे की, घणसोली परिसरात स्वतंत्र उपकेंद्र उभारण्याबाबत लागणार्या जागेची मागणी सिडकोकडे महावितरणच्या कार्यालयातर्फे करण्यात आलेली आहे. ही जागा प्राप्त होताच स्वतंत्र उपकेंद्र उभारण्यात येणार असून त्यामुळे गघांसॉलिकारांची व आजूबाजूच्या विभागातील नागरिकांची समस्या दूर होणार आहे.