घनकचरा प्रकरणी जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करा

जळगाव – महापालिकेचा घनकचरा प्रकल्पावरूनवाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत. गेल्या सात वर्षांपासून बंद पडलेला हा प्रकल्प मनपा प्रशासन व राज्य शासनाच्या चुकांमुळे अद्यापही सुरू होऊ शकलेला नाही. या प्रकल्पाच्या कामासाठी निधी मंजूर असून, कविता प्रक्रियादेखील राबवण्यात आली आहे.हा प्रस्ताव मंजुरीसाठी महासभेत ठेवण्याआधी या प्रकल्पाच्या डीपीआर मध्ये चुका केलेल्या अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करावी व त्याच्यावर कारवाई करावी अशी मागणी मनपातील १८ नगरसेवकांनी केली आहे.

याबाबत गुरुवारी नगरसेवकांनी मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांना निवेदन दिले आहे. तसेच जोपर्यंत या प्रकरणातील दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होणार नाही तोपर्यंत घनकचरा प्रकल्पाचा नवीन डीपीआर च्या मंजुरीचा प्रस्ताव महासभेत मांडण्यात येऊ नये अशी मागणी केली आहे. मनपा आयुक्तांना देण्यात आलेल्या निवेदनावर, ऍड. दिलीप पोकळे, प्रतिभा देशमुख, रियाज बागवान, रेश्मा काळे, रंजना सपकाळे, चेतन सनकत, नवनाथ दारकुंडे, प्रतिभा पाटील, शोभा बारी, प्रवीण कोल्हे, सुरेखा तायडे, मीनाक्षी पाटील, सुरेखा सोनवणे, प्रवीण कोल्हे, मीना सपकाळे या नगरसेवकांची स्वाक्षरी आहे.