सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प नसल्यामुळे दोन कोटींचा निधी गो
जळगाव- मलनि:सारण प्रक्रिया प्रकल्पाअंतर्गत सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प नसल्यामुळे मनपाचे दोन कोटीचे बँक खाते गोठविण्यात आले आहे. त्याच पध्दतीने घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पा उभारणीचे काम सुरु न झाल्यास स्वच्छ भारत अभियान अंतर्गत प्राप्त झालेल्या निधीचे बँक खातेही गोठविण्याची शक्यता आहे.
स्वच्छ भारत अभियानातंर्गत घनकचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी मनपाने केलेल्या डीपीआर ला शासनाने मंजुरी देवून 30 कोटींचा निधी मंजूर केला.या निधीतून आव्हाणे शिवारात प्रकल्प उभारण्यासाठी निविदा मागविण्यात आल्या होत्या.त्यानुसार सर्वात कमी दराची प्राप्त झालेल्या निविदेला मंजुरी देण्याचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी स मितीच्या पटलावर ठेवण्यात आला होता.मात्र सत्ताधारी भाजपने निविदा मंजुरीचा ठराव स्थगित ठेवला आहे.
हरीत लवाद समितीचा तगादा
आव्हाणे शिवारात घनकचरा प्रकल्प उभारण्यासाठी शासनाने नियुक्त केलेल्या राष्ट्रीय लवाद समिती सदस्यांनी पाहणी केली. त्यानुसार आव्हाणे शिवारात असलेल्या प्रक ल्पाच्या जागेवर साठविण्यात आलेल्या कचर्याची शास्त्रोक्त पध्दतीने विल्हेवाट लावावी आणि त्यानंतर लगेचच प्रकल्प उभारणीचे काम हाती घेण्याची सूचना मनपाला दिली.त्यासाठी राष्ट्रीय हरीत लवाद समितीने काम सुरु करण्यासाठी तगादा लावलेला आहे.मात्र बुधवारी झालेल्या स्थायी समितीत घनकचरा प्रकल्पाचे दोन्ही ठराव स्थगित ठेवले आहे. त्यामुळे कामांना विलंब होणार आहे.परिणामी प्रकल्पासाठी प्राप्त निधी असलेल्या बँकेचे खाते गोठविण्याची नामुष्की मनपावर ओढावण्याची शक्यता आहे.
अॅक्सीस व एचडीएफसी बँकेचे खाते अद्यापही उघडले नाही
हुडको कर्जापोटी दोन वेळा मनपाचे खाते गोठविण्याची नामुष्की ओढावली आहे. दुसर्यांदा गोठविण्यात आल्यानंतर खाते उघडण्यात आले.मात्र अॅक्सीस व एचडीएफसी बँकेने खाते उघडण्यास नकार दिला.त्यामुळे अद्यापही दोन्ही बँकेचे खाते उघडलेले नाही.