दोन शिफ्टमध्ये कचरा संकलन ; वाहने दुरुस्त करण्याच्या दिल्या सूचना
जळगाव : आव्हाणे शिवारात असलेल्या घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या जागेवर कचर्याची साठवणूक करण्याच आली आहे. कचर्यावर बायोमायनिंग करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी शुक्रवारी सांयकाळी पाहणी केली. दरम्यान, शहरात गेल्या काही दिवसापासून अस्वच्छतेचा व कचराकोंडीचा प्रश्न निर्माण झाला आहे . त्यामुळे कचर्याची दोन शिफ्टमध्ये विल्हेवाट लावावी.तसेच नादुरुस्त वाहने तात्काळ दुरुस्त करण्याबाबत देखील सूचना दिल्या आहेत.
शहरात गेल्या महिनाभरापासून सफाई मतदाराने कचरा संकलन व स्वच्छतेचे काम बंद केले आहे .त्यामुळे शहरात कचरा कोंडीचा प्रश्न निर्माण झाला असून नागरिकांचे आरोग्य देखील धोक्यात आले आहे. तसेच मस्ती दाराचा ठेका रद्द करण्याबाबत सर्व स्तरातून मागणी होत असल्याने प्रशासनावर देखील याचा दबाव वाढलेला आहे .त्यामुळे शहरातील घनकचरा व्यवस्थापन यंत्रणेची आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी सायंकाळी पाहणी केली . यावेळी सहाय्यक आयुक्त तथा आरोग्य अधिकारी पवन पाटील यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
मनपाची अनेक वाहने नादुरुस्त
महापालिकेच्या आरोग्य विभागातील कचरा संकलन व कचरा वाहून नेणारे जुने वाहने अनेक नादुरुस्त पडलेले आहेत. नादुरुस्त वाहने त्वरित दुरुस्त करून कचरा संकलन करण्याच्या यंत्रणेत वाहनाचा समावेश करण्याची सूचना आयुक्तांनी आरोग्य विभाग व वाहन विभागाला दिले आहेत.