घनकचरा व्यवस्थापन नियमांचे पालन न करणार्‍या व्यावसायिकांवर कारवाई

0

नवी मुंबई । केंद्र शासनाने मानवी पर्यावरणाचे रक्षण करणेकरीत पर्यावरण (संरक्षण) कायदा 1986 मधील अधिकाराचा वापर करून, घनकचरा ( व्यवस्थापन वहाताळणी ) नियम 2016 संमत केलेला असून नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सर्व सहकारी गृहनिर्माण संस्था व हॉटेल व्यावसायिक यांनी त्याचे पालन करणे आवश्यक आहे.त्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 5000 चौ.मी. पेक्षा जास्त क्षेत्रफळ असणार्‍या सहकारी गृहनिर्माण संस्था व हॉटेल व्यावसायिक यांना महापालिकेकडून यापूर्वीच मुख्यालय व विभाग कार्यालय स्तरावरुन तोंडी व लेखी सूचना दिलेल्या आहेत. असे असूनसुद्धा काही व्यावसायिक / सोसायट्या ओल्या कचर्‍यावर प्रक्रिया करत नसल्याचे निदर्शनास आल्यानुसार नेरुळ येथील हावरे सेंच्युरीयन मॉल यांना 20 एप्रिल 2018 पर्यंत ओल्या कचर्‍यावर त्यांच्या जागेवरच प्रक्रिया करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे.

युद्धपातळीवर कार्यवाही सुरू
त्याचप्रमाणे जगद्गुरू आदी शंकराचार्य मार्ग, सेक्टर 19, नेरुळ येथील डॉमिनोज् पिझ्झा यांना रस्ते तसेच फुटपाथवर कचरा टाकू नये आणि देण्यात आलेल्या डस्टबीनमध्ये कचरा व्यवस्थितरीत्या कचरा संकलित करावा यासाठी सूचना देऊनही सूचनांचे पालन न केल्यामुळे घनकचरा (व्यवस्थापन व हाताळणी) नियम 2016नुसार छेप उेाश्रिळरपलश नोटीस बजाविण्यात आलेली आहे तसेच यानंतरही सुधारणा न झाल्यास महाराष्ट्र प्रांतिक महानगरपालिका अधिनियम कलम 378 नुसार त्यांचा परवाना रद्द करुन दुकान सिलबंद करण्यात येईल, अशी सक्त ताकीद देण्यात आलेली आहे. गृहनिर्माण संस्था व हॉटेल व्यवसायिकांना ओल्या कचर्‍यावर त्यांच्या जागेवरच प्रक्रिया करण्याची नोटीस बजावण्यात आलेली असून त्यांनी दिलेल्या मुदतीत प्रकल्प कार्यान्वित न केल्यास नवी मुंबई महानगरपालिका त्यांच्या गृहनिर्माण संस्थेमधील व हॉटेलमधील कचरा वाहतूक बंद करेल, अशी समज नोटीस देताना विभाग कार्यालयातील स्वच्छता अधिकारी आणि स्वच्छता निरिक्षक यांचेमार्फत संबंधित गृहनिर्माण संस्था व हॉटेल व्यवसायिकांना देण्यात आली आहे. स्वच्छ शहराच्या नावलौकिकात भर घालण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी. एन. यांच्या निर्देशानुसार घनकचरा (व्यवस्थापन व हाताळणी)नियम 2016 चे योग्य प्रकारे अनुपालन करणेची काळजी घेण्यात येत असून त्यादृष्टीने घनकचरा व्यवसाथापन विभागाचे उपआयुक्त तुषार पवार यांच्या नियंत्रणाखाली आठही विभाग कार्यालयातील स्वच्छता अधिकारी व स्वच्छता निरीक्षक यांनी युद्धपातळीवर कार्यवाही सुरू केलेली आहे. नवी मुंबईकर नागरिकांनीही ‘आपला कचरा ही आपली जबाबदारी’ या संकल्प वाक्यानुसार शहर स्वच्छतेत कर्तव्य भावनेने आपले संपूर्ण योगदान द्यावे, असे आवाहन करण्यात येत आहे.