चाळीसगाव । घन कचरा, शेण व वाया जाणार्या कचर्यापासून चाळीसगाव तालुक्यातील बोरखेडे गावाजवळ चाळीसगाव अॅग्रो अॅण्ड इकोफ्युवल प्रोड्युसर्स वैंपनी लि. च्या वतीने बायोगॅस, सेंद्रीय खत, ऊर्जा तसेच गाड्यांचे इंधन तयार करण्याचा भारत देशातील पहीला शेतक-यांनी चालविलेला 10 कोटीचा महत्वकांक्षी प्रकल्प जवळपास अडीच एकर वर लवकरच सुरू होणार असल्याची माहीती माजी मंत्री एम.के.आण्णा पाटील यांनी 3 फेब्रुवारी रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे. या प्रकल्पामुळे जवळपास 2 हजार शेतकर्यांना भागीदारीचा लाभ मिळणार असून 220 च्या वर लोकांना या माध्यमातून रोजगार मिळणार आहे.
परदेशी टेक्नोलॉजीचा वापर
केंद्र सरकार व राज्य सरकारचा या प्रकल्पात सहभाग असणार असून यासाठी प्रकल्पाची उभारणी करण्यात येत आहे. या प्रकल्पाचे मॉडेल देशात पहीले होईल. अमेरीका व जर्मन टॅकनोलॉजी या प्रकल्पात वापरण्यात येणार आहे. भारताचे मुळ रहीवासी व सध्या अमेरीका येथे रहीवासी असलेले या कंपनीचे टॅकनिकल सल्लागार संजय पटेल 3 फेब्रुवारी रोजी चाळीसगाव येथे आले असतांना माजी मंत्री एम.के.आण्णा पाटील व हा प्रकल्प स्थापन करण्यासाठी 10 शेतकर्यांच्या मंडळाने आयोजीत पत्रकार परिषदेत ही माहीती दिली.
प्रकल्प एक वर्षांत होणार पूर्ण
हा प्रकल्प सुरू करण्यासाठी माजी मंत्री एम.के.आण्णा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.एम.डी.पाटील मुंदखेडा, रामकृष्ण पाटील हातगाव, यशवंत पाटील हातले, कैलास सुर्यवंशी टाकळी प्र.दे, धर्मा काळे सायगाव, रमेश पाटील आडगाव, विशाल पाटील देवळी, पांडूरंग माळी पातोंडा, अरूण भालेराव हातगाव, मच्छिद्र राठोड वलठाण अशा 10 जणांनी मिळून चाळीसगाव अॅग्रो अॅण्ड इकोफ्युवल प्रोड्युसर्स वैंपनी लि. स्थापन करण्यात आली आहे. हा प्रकल्प 12 महीन्यात पुर्ण होईल अशी माहीती माजी मंत्री एम.के.आण्णा पाटील यांनी दिली आहे.
7/12 असणारे शेतकरी भागीदार
या प्रकल्पासाठी दररोज 50 टन कचरा संकलीत करणार असल्याचे माहीती देत यासाठी शेण, भुशासारखा पदार्थ, मार्वेैट कमिटी व नगरपालिकेच्या माध्यमातून वाया जाणार्या कचर्यापासून बायोगॅस, सेंद्रीय खत, ऊर्जा तसेच गाड्यांचे इंधन तयार होणार आहे. दररोज अडीच टन गॅस, 30 टन सेंद्रीय खत एका दिवसाला तयार होणार आहे. या प्रकल्पासाठी 10 कोटीचे भाग भांडवल असणार असून जवळपास 2 हजार शेतकरी शेअर्सच्या माध्यमातून या प्रकल्पाला भागीदार असणार आहे. कमीत कमी 10 रूपये व जास्तीत जास्त 1 हजार रूपयाचा शेअर्स ठेवण्यात आला असून जो जेवढा शेअर्स घेईल तो शेतकरी तेवढा भागीदार असणार आहे. त्यासाठी शेतीचा 7/12 असणार्या शेतकर्यांना या प्रकल्पात भागीदार होण्याचे आवाहन कैलास बापु सुर्यवंशी, एम.के.आण्णा पाटील, डॉ.एम.डी.पाटील व मंडळाने केले आहे.