घरकुलच्या निकालानंतर भाजप नगरसेवकांमध्ये घबराट !

0

गाळ्यांबाबत पाचपट दंड रद्दचा केला ठराव

जळगाव: मनपा मालकीच्या मुदत संपलेल्या 18 व्यापारी संकुलांतील गाळेधारकांनी थकबाकी न भरल्यामुळे पाच पट दंडचा ठराव केला होता. मात्र मनपात भाजपची सत्ता आल्यानंतर पाच पट रद्दचा ठराव करण्यात आला आहे. या ठरावामुळे मनपाचे मोठ्याप्रमाणात आर्थिक नुकसान होणार आहे. त्यामुळे हा ठराव विखंडीत करण्यासाठी शासनाकडे पाठवावा यासाठी काही पदाधिकारी आणि भाजप नगरसेवकांनी आयुक्तांना गळ घातली आहे. नुकत्याच लागलेल्या घरकुल खटल्याच्या निकालाचे पडसाद उमटले असून भाजपा नगरसेवकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.


मनपा मालकीच्या 28 व्यापारी संकुलांपैकी 18 व्यापारी संकुलातील 2387 गाळ्यांची मुदत 2012 मध्ये संपुष्टात आली आहे. गाळे कराराने देण्याबाबत 135 क्रमांकाच्या ठरावासह काही ठराव करण्यात आले होते.मात्र गाळेधारकांनी विरोध करुन न्यायालयात धाव घेतली.तसेच मुख्यमंत्र्यांकडे देखील तक्रार केली होती. यावर नगरविकास राज्यमंत्र्यांकडे सुनावणी झाली होती. गाळेधारकांडे थकबाकी असल्यामुळे आणि वसूलीसाठी मागील सत्ताधारी खाविआने पाच पट दंड करण्याचा ठराव केला होता.मात्र हा ठराव चूकीचा व अन्यायकारक असल्याने पाच पट दंडाचा ठराव रद्द करण्याची आग्रही भूमिका भाजपने घेतली.त्यानुसार महासभेत समिती देखील गठीत करण्यात आली होती. मनपाच्या सत्ताधारी भाजपने पाचपट दंड रद्दचा ठराव केला.

पाचपट दंड रद्दच्या ठरावामुळे मनपाचे आर्थिक नुकसान
गाळेधारकांकडे असलेली थकबाकी वसुल करण्यासाठी करण्यात आलेला पाचपट दंडचा ठराव रद्द करण्याचा ठराव भाजप सत्ताधार्‍यांनी केला.मात्र हा ठराव मनपाच्या हिताचा नसून आर्थिक नुकसानीचा आहे. या ठरावामुळे भाजप नगरसेवकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.त्यातल्या त्यात घरकुलच्या निकालामुळे ठराव करणार्‍यांना शिक्षा सुनावण्यात आल्याने या निकालाचे पडसाद मनपात उमटले आहे. त्यामुळे भाजप नगरसेवकांनी चांगलीत धास्ती घेतल्याची चर्चा रंगू लागली आहे.

भाजपचे नगरसेवक अडचणीत येण्याची शक्यता
गाळ्यांबाबत पाचपट दंडचा ठराव रद्द करण्यासाठी महासभा घेण्यात आली होती. या ठरावादरम्यान भाजपचे सात नगरसेवक अनुपस्थित होते. मात्र इतर भाजपचे नगरसेवक अडचणीत येण्याची शक्यता आहे.त्यामुळे भाजपच्या काही नगरसेवकांनी आयुक्तांची भेट घेवून ठराव विखंडीत करण्यासाठी पाठवावा यासाठी विनंती केली असल्याची चर्चा आहे.


सात नगरसेवक अनुपस्थित
भाजपच्या 57 नगरसेवकांपैकी 7 नगरसेवक अनुपस्थित होते. जर घरकुलसारखी कारवाई झाली तर भाजपच्या 50 नगरसेवकांना अडचण येण्याची शक्यता आहे. यासंदर्भात मनपात चर्चा रंगू लागली आहे.प्रिया जोहरे, सरिता नेरकर, दिलीप पोकळे, रुकसानाबी खान, कांचन सोनवणे, नवनाथ दारकुंडे, गायत्री शिंदे, किशोर बाविस्कर, मिना सपकाळे, दत्तात्रय कोळी, रंजना सपकाळे, प्रविण कोल्हे, चेतन सनकत, भारती सोनवणे, चेतना चौधरी, मुकुंदा सोनवणे, अमित काळे, मंगला चौधरी, शुचिता हाडा, धिरज सोनवणे, सिमा भोळे, दिपमाला काळे, अश्‍विन सोनवणे, सचिन पाटील, लता भोईटे, प्रतिभा पाटील, चंद्रशेखर पाटील, मयूर कापसे, प्रतिभा कापसे, प्रतिभा देशमुख, विजय पाटील, सुरेश सोनवणे, शोभा बारी, शेख हसिनाबी, कुलभूषण पाटील, पार्वताबाई भिल, उषा पाटील, सिंधू कोल्हे, ललित कोल्हे, उज्ज्वला बेंडाळे, गायत्री राणे, सुरेखा तायडे, ज्योती चव्हाण, जितेंद्र मराठे, अंजनाबाई सोनवणे, रेखा पाटील, सुरेखा सोनवणे, सदाशिव ढेकळे, राजेंद्र पाटील, भगत बालाणी, रजनी अत्तरदे, रेश्मा काळे, मनोज आहुजा, मिनाक्षी पाटील, रंजना वानखेडे (सोनार), सुनिल खडके, विश्‍वनाथ खडके या 57 नगरसेवकापैकी 7 नगरसेवक अनुपस्थित होते.