घरकुलांचे काम न केल्यास आंदोलनाचा इशारा

0

धुळे । जुने धुळ्यातील नवीन भिलाटीतील घरकुलांचे बांधकाम महापालिकेने सुरू न केल्यास आठवडाभरात आदिवासी भिल्ल समाजाला सोबत घेवून शिवसेनेच्या माध्यमातून महापालिकेविरोधात आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा जिल्हा प्रमुख हिलाल माळी यांनी दिला आहे. जुने धुळ्यातील नविन भिलाटीत प्रस्तावित घरकुल योजनेसाठी आदिवासी भिल्ल समाजाने आपली घरे काढून घेतली. परंतू यात राजकारण होत असून काही मोजक्या लोकांनी घर न काढता योजनेला अडथळा निर्माण केला आहे. मनपाने आदिवासी बांधवांना तात्पुरत्या स्वरूपात पत्र्याचे शेड बांधून दिले होते. अवकाळी वादळी पावसाने अनेक घरांचे पत्रे उडून गेले असून घरात पाणी शिरल्याने नागरिकांचे नुकसान झाले.

घरकुल योजनेत राजकारण नको
अडथळा ठरत असलेली अतिक्रमणे काढल्यानंतरही मनपाने घरकुलांचे काम सुरू करणे अपेक्षीत होते. पण तसे झाले नाही. यापूर्वी आ.अनिल गोटे यांनी राजकीय द्वेषातून घरकुलाच्या कामात खोडा घातला होता. तसेच नगरसेवक चंद्रकांत सोनार हे देखील द्वेषाचे राजकारण करीत आहेत. काही दिवसापूर्वी आ. गोटे यांच्या घरी चंद्रकांत सोनार यांनी भेट घेतली होती. तसे वृत्त प्रसारमाध्यमांनी प्रसिध्द केले होते. दोघांच्या भेटीत काय झाले ते त्यांनाच ठाऊक परंतू घरकूल योजनेत राजकारणाचे पडसाद उमटतांना दिसत आहेत. संबंधित लाभार्थ्यांना जाणून बुजून त्रास देण्यासह त्यांच्यामध्ये दोन गट पाडून अनर्थ घडवायचा हेतू लपून राहिलेला नाही, असेही हिलाल माळी यांनी पत्रकात नमूद केले