घरकुलातील विद्यमान नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार

0

अपिलात जाण्याची संधी मात्र प्रक्रिया मोठी

जळगाव-घरकुल खटल्यात शिक्षा सुनावलेल्या 48 जणांमध्ये महानगरपालिकेचे पाच विद्यमान नगरसेवक आहेत.दोन वर्षापेक्षा अधिक शिक्षा सुनावल्यास अपात्रेची तरतूद आहे.मात्र विद्यमान नगरसेवकांना उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात जाण्याची संधी आहे.जर अपिल फेटाळले तर अपात्रतेची कारवाई होवू शकते.त्यामुळे मनपातील विद्यमान पाच नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती आहे.
तत्कालीन जळगाव नगरपालिकेने राबविलेल्या बहुचर्चित घरकुल घोटाळा प्रकरणी धुळे विशेष न्यायालयाने माजी आमदार सुरेशदादा जैन,गुलाबराव देवकर,विद्यमान आमदार चंद्रकांत सोनवणे,प्रदीप रायसोनी,राजा मयूर,मेजर नाना वाणी यांच्यासह 48 आजी-माजी नगरसेवकांना शिक्षा सुनावली. यात जळगाव महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक भगत बालाणी,सदाशिव ढेकळे,दत्तू कोळी,कैलास सोनवणे,लताताई भोईटे यांचाही समावेश आहे. संबंधित पाचही विद्यमान नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे.
दोन वर्षाच्यावर शिक्षा झाल्यास अपात्र
एखाद्या खटल्यात दोन वर्षापेक्षा अधिक शिक्षा झाल्यास अपात्र होवू शकते अशी कायद्यात तरतूद आहे.मात्र उच्च न्यालय आणि सर्वोच्च न्यायालयात अपिल करण्यास संधी आहे. संबंधितांनी अपिल केल्यानंतर उच्च न्यायालयाने अपिल फेटाळल्यास अपात्रतेची कारवाई होवू शकते.मात्र न्यायालयाकडून दिलासा मिळाल्यास अपात्रतेची कारवाई टळू शकते.
..तर मनपाची होवू शकते पोटनिवडणूक
घरकुल खटल्यातील विद्यमान पाचही नगरसेवकांनी धुळे विशेष न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेच्या विरोधात उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठात अपिल केल्यानंतर फे टाळल्यास सर्वोच्च न्यायालयात दाद मागू शकतात.मात्र सर्वोच्च न्यायालयाने धुळे न्यायालयाचा निर्णय कायम केल्यास पाचही नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई होवू शक ते.त्यामुळे पाचही जागांवर पोटनिवडणूक होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.