जळगाव: बहुचर्चित घरकुल घोटाळ्याचा निकाल हा राजकीय क्षेत्रात मोठा धक्का देणारा ठरला आहे. आताच्या भाजपासह शिवसेनेच्याही लोकप्रतिनीधींचा यात सहभाग राहीला आहे. या निकालात माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्यासह राष्ट्रवादीचे माजी मंत्री गुलाबराव देवकर, प्रदीप रायसोनी या दिग्गजांना शिक्षा सुनावली गेल्याने राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान न्यायालयाच्या या निकालाबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गिरीश महाजन आणि शिवसेनेचे सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांची प्रतिक्रीया जाणून घेण्यासाठी संपर्क साधला असता या दोन्ही मंत्र्यांनी भ्रमणध्वनी स्विकारले नाही. त्यांचे स्विय्य सहायकांना संपर्क केला असता या विषयावर प्रतिक्रीया देऊ शकत नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे या निकालाचा धक्का पालकमंत्र्यांसह राज्यमंत्र्यांनाही बसला की काय? असाच प्रश्न यानिमीत्ताने उपस्थित होत आहे.