जळगाव । तत्कालीन जळगाव नगरपालिकेतील घरकुल घोटाळ्यात सर्व संशयितांना धुळे येथील विशेष कोर्टाने दोषी ठरविले असून, प्रमुख संशयित आरोपींपैकी माजी आमदार सुरेशदादा जैन यांना 7 वर्षांची शिक्षा आणि 100 कोटी रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. धुळे येथील कोर्टाचे न्या. सृष्टी नीळकंठ यांनी हा निकाल दिला आहे.