एैतिहासिक निकालामुळे समाजात चांगला संदेश
जळगाव:सुरेशदादा जैन यांना 7 वर्ष शिक्षा व 100 कोटी रुपये दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे. राजेंद्र मयुर व जगन्नाथ वाणी यांना प्रत्येकी 40 कोटी रुपये दंड आकारण्यात आला. अशा प्रकारे 180 कोटी रुपये दंड, प्रदीप रायसोनी यांना 10 लाख रुपये दंड आकारण्यात आली. इतरांनाही शिक्षा व दंड ठोठावण्यात आला. आरोपींकडून जास्तीत जास्त दंड आकारण्यात आला आहे. न्या. सृष्टी निळकंठ यांच्या न्यायालयाने जो एैतिहासिक निकाल दिला. त्यामुळे समाजात चांगला संदेश जाईल. लोकप्रतिनिधींनाही आपण करत असलेले काम कायदेशीर मार्गानेच केले पाहिजे, असा चांगला संदेशही जाईल. शिक्षेवर समाधानी असलो तरी संशयितांना जास्तीत जास्त शिक्षा मिळावी यासाठी उच्च न्यायालयात अपील दाखल करण्यात येणार आहे: अॅड. प्रविण चव्हाण, सरकारी वकील,