इंदापूर : प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 13 लाभार्थ्यांना इंदापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष अंकिता शहा आणि मुख्याधिकारी रामनिवास झंवर यांच्या हस्ते 40 हजार रुपये रकमेचा प्रथम हप्ता जमा केल्याचे प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. 136 लाभार्थ्यापैकी घराच्या बांधकामाचा पाया पूर्ण केलेला आहे, अशा तेरा लाभार्थ्यांना 40 हजार रुपयांचा पहिला हप्ता त्यांच्या खात्यामध्ये जमा केल्याचे प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. या योजनेअंतर्गत 40 हजार रुपयाप्रमाणे पाच आणि शेवटचा 50 हजार रुपयांचा हप्ता, असे एकूण 2 लाख 50 हजाराचे अनुदान लाभार्थ्यांना मिळणार आहे.
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अनुराधा गायकवाड, माणिक हिंगमिरे, राजाराम गोरे, रामदास पवार, कस्तुरा धोत्रे, पार्वती पवार, लता घनवट, नितीन धोत्रे, बाळाबाई जामदार, सखुबाई राऊत, सुलभा खांबसवाडकर, कल्याणी साबळे, सुनिता जगताप या लाभार्थ्यांना बांधकाम केलेल्या प्रगतीनुसार पीईएमएस प्रणालीमधून अनुदान अदा केल्याचे शहा यांनी सांगितले. यावेळी नगरसेविका हेमलता मालुंजकर, प्रकल्प समन्वयक सुभाष ओहाळ उपस्थित होते.