घरकूलचे अर्ज मंजूरीसाठी तात्काळ पाठवावे

0

जळगाव । जिल्हाभरात पंतप्रधान आवास योजनेसह विविध घरकुलांच्या कामासाठी यावर्षी 10 हजाराचे उदिष्ट देण्यात आले आहे. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांना वेळेवर पहिला हप्ता देण्याचे आदेश मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी गटविकास अधिकार्‍यांना दिले. तसेच उदिष्ट पुर्ण करण्यासाठी तात्काळ प्रस्तावांची छाननी करून मंजुरीसाठी पाठविण्याच्या सुचना त्यांनी दिल्या. जिल्हाभरातील गटविकास अधिकार्‍यांची बैठक जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणेच्या कार्यलयात झाली. यावेळी त्यांनी घरकुल योजनांचा आढावा घेतला. घरकुलांसाठी शासनाकडून अनुदान उपलब्ध करण्यात आले असुन त्याचा विनीयोग तात्काळ करण्यासाठी बैठकीत नियोजन करण्यात आले.

प्रतिनिरुक्त्रांबाबत आठवडाभरात निर्णय
जिल्हा परिषदेत प्रतिनियुक्त कर्मचार्‍यांच्या मुळ आस्थापनेवर बदल्या झाल्या असल्या तरी प्रतिनियुक्त कर्मचारी काम करीत असल्याची बाब समोर आणली. याबाबत सीईओ कौस्तुभ दिवेगावकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, प्रतिनियुक्त्यांबाबत आठवडाभरात पुन्हा बैठक घेवून विभाग प्रमुखांकडून माहीती घेतली जाईल,काही विभागाकडून कर्मचार्‍यांची मागणी केली जात असल्याने आयुक्तांकडे याबाबत प्रस्ताव पाठविला जाईल असेही ते म्हणाले.