घरगुती गॅसचा काळाबाजार : 12 हजारांचे गॅस सिलिंडर जप्त

जळगाव : शहरातील एस.टी.वर्कशॉप जवळील लक्ष्मणभाऊ नगरात घरगुती गॅसची काळ्या विक्री सुरू असल्याची माहिती शनीपेठ पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी धाड टाकत तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला. तीन सिलिंडरसह साडेबारा हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
शहरातील एस.टी.वर्कशॉपसमोरील लक्ष्मणभाऊ नगर परीसरात घरगुती गॅसचा बेकायदेशीर वापर करून काळाबाजार होत असल्याची गोपनीय माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी गुरुवार, 4 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7.30 वाजता छापा टाकून कारवाई केली. घरगुती गॅसचे तीन गॅस सिलेंडर आणि गॅस भरण्याचे साहित्य मिळून एकूण 12 हजार 510 किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याबाबत शनिपेठ पोलीस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबल राहुल घेटे यांच्या फिर्यादीवरून मंगेश सुरेश कुवर (36ग, रा.लक्ष्मणभाऊ नगर, जळगाव) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुरेश सपकाळे करीत आहे.