घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट : वरणगाव फॅक्टरीतील पिता-पूत्र जखमी

वरणगाव :  घरगुती गॅस सिलिंडरला अचानक आग लागून वरणगाव फॅक्टरीतील दोन कर्मचारी जखमी झाल्याची घटना 28 ऑक्टोबर रोजी घडली. याबाबत वरणगाव पोलीस स्टेशनला नुकतीच नोंद करण्यात आली.

चहा बनवताना झाली गॅस गळती
वरणगाव फॅक्टरी वसाहतीत क्वॉर्टर नंबर 176 मध्ये राहणारे श्रीकांत आत्माराम विसाळे (57) व हेमंत श्रीकांत विसाळे दोघे पिता-पुत्र घरात स्वयंपाक घरामध्ये चहा बनवत असताना अचानक सिलेंडरची गळती झाल्याने सिलेंडरने पेट घेतला. दोघांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला परंतु ते दोघे भाजले. त्यावेळेस शेजारील व्यक्तींनी ही आग विझविण्याचा प्रयत्न केला. श्याम मस्के, योगेश सूर्यवंशी व इतरांनी जळालेल्या दोघांना व सिलेंडरला बाहेर काढले. वरणगाव फॅक्टरीच्या अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली परंतु या आगीत श्रीकांत 45 टक्के जळाला असून हेमंत हा 60 टक्के भाजला आहे. त्यांना लागलीच बर्‍हाणपुर येथील आल इज वेल दवाखान्यातून भरती आले परंतु तब्येतीत सुधारणा करण्यासाठी त्यांना सध्या मुंबई येथील ऐरोली बर्न हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले. घटनास्थळी इंडियन ऑईल कंपनीचे अधिकारी ठाकरे यांनी भेट दिली आहे. या प्रकरणी वरणगाव पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आली. अधिक तपास सहा.निरीक्षक आशिषकुमार अडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल नरसिंग चव्हाण करीत आहेत.