घरगुती विजचोरी करणार्‍या 11 ग्राहकांवर कारवाई

0

मुक्ताईनगर : तालुक्यातील पिंप्री आकाराऊत येथे घरगुती विजेची चोरी करणार्‍या 11 ग्राहकांवर सहाय्यक अभियंता श्रीकांत वावरे यांच्या पथकाने कारवाई केली. यामुळे परिसरातील गावांमध्ये खळबळ उडाली असून इतरही गावांमध्ये पथक धडकणार आहे.
विजेची होणारी चोरी आणि गळती रोखण्याकरीता वीज वितरण कंपनीकडून सातत्याने प्रयत्न सुरु आहे. तालुक्यातील काही गावांमध्ये सर्रास आकडे टाकून विजचोरी केली जात आहे. याअनुषंगाने मिळालेल्या माहितीच्या आधारावर कुंड व पिंप्री आकाराऊत येथे लघुदाब वाहिन्यावर आकोडे टाकून विजचोरी होत असल्याची माहिती मिळताच पथक दोन्ही गावांमध्ये दाखल झाले. त्यांनी गावाची तपासणी करुन अनधिकृतरित्या वीज चोरीसाठी वापरलेली 45 फूट वायर जप्त केली. पथकप्रमुख श्रीकांत सोनवणे, ललित पटेल, शितल तायडे, ताजणे, अनिल मिस्तरी, कुळकर्णी यांनी कारवाई केली.