तळेगाव दाभाडे : तळेगाव दाभाडे नगर परिषदेची घरपट्टी आणि पाणीपट्टीची विक्रमी वसुली झाली असून शिल्लक राहिलेल्या थकबाकीदरांची वसुली करण्यासाठी नगर परिषदेने विशेष धडक मोहीम हाती घेतली आहे. अशी माहिती नगर परिषदेचे मुख्याधिकारी वैभव आवारे आणि कर संकलन अधिकारी विजय भालेराव यांनी केली आहे. नगर परिषदेचे मुख्याधिकारी आवारे आणि कर संकलन अधिकारी भालेराव यांनी 100 टक्के करवसुलीचे उद्दिष्ठ ठेवले होते. मात्र प्रत्यक्षात 89 टक्के कर वसुली झाली. राहिलेल्या थकबाकीदरांची वसुली करण्यासाठी धडक वसुली मोहीम हाती घेतली आहे.
यासाठी कर वसुली विभागातील संभाजी भेगडे, सुनील कदम, प्रवीण माने, तुकाराम मोरमारे, प्रशांत गायकवाड, विलास वाघमारे, विशाल लोणारी आदेश गरुड यांनी आपापल्या विभागातील थकबाकीदारांची यादी तयार करून वसुलीसाठी प्रयत्न करावेत अश्या सूचना मुख्याधिकारी यांनी वसुली आढावा बैठीकीत दिल्या.
15 कोटी रूपये घरपट्टी वसुल
यावर्षी घरपट्टी 16 कोटी 95 लाख रुपये वसूल करावयाचे होते. यापैकी 15 कोटी 2 लाख रुपये वसूल झाले आहेत. यावर्षी नगर परिषद प्रशासनाने स्वच्छ सर्वेक्षणच्या कामासाठी फेब्रुवारी मध्यापर्यंत काम केले. त्यावेळी करवसुली कडे कर्मचारीवर्गाचे दुर्लक्ष झाले होते. परंतु गेली दीड महिन्यात वसुलीची मोहीम हाती घेऊन उद्दीष्ठा पर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केल्यामुळे कर्मचारी वर्गात समाधान व्यक्त करण्यात येत आहे.