सद्यस्थितीत शहरात पाण्याचे समन्यायी पद्धतीने वाटप करण्यासाठी प्रयत्न
20 हजार लिटरपुढील वापरासाठी 100 रुपये पाणीपट्टी दर प्रस्तावित
पिंपरी चिंचवड- धरणात मुबलक पाणीसाठा असतानाही पिंपरी-चिंचवडकरांना हिवाळ्यापासून दिवसाआड पाणीपुरवठ्याला सामोरे जावे लागत असताना आता पाणीपट्टीत वाढ केली जाणार आहे. सहा हजार लिटरपर्यंत पाणी मोफत दिले जाणार असून सहा ते 15 हजार लिटरसाठी आठ रुपये, 15 ते 20 हजार लिटरपर्यंत 40 रुपये पाणीपट्टी आकारण्यात येणार आहे. 20 हजार लिटरपुढील वापरासाठी 100 रुपये पाणीपट्टी दर प्रस्तावित करण्यात आला आहे. व्यापारी पाणीवापरासाठीचा दर 55 रुपये निश्चित करण्यात आला आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मान्यतेसाठी ठेवला आहे.
दरांमध्ये वार्षिक 5 टक्के वाढ…
महापालिकेने 20 एप्रिल 2018 मध्ये पाणीपट्टी दरामध्ये सुधारणा केली आहे. त्यानुसार पाणीपट्टी आकारण्यात येते. सद्यस्थितीत शहरात पाण्याचे समन्यायी पद्धतीने वाटप करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. तथापी, प्रत्येक नळजोडावरील पाणी वापरावर नियंत्रण ठेवणे शक्य नाही. उतारावरील भागात जास्त पाणी उपलब्ध होते. त्यामुळे तेथे मानकापेक्षा जास्त पाणी वापर करण्याची प्रवृत्ती दिसते. उंचावरील भागात पाण्याचा तुटवडा जाणवतो. समन्यायी पाणीपुरवठा करण्यासाठी 100 एलपीसीडी पेक्षा जास्त पाणीवापर करणार्या ग्राहकांवर वचक ठेवण्यासाठी जास्त दर लावण्यात येणार आहेत. याचा विचार करुन पाणीपट्टीचे सुधारित दर प्रस्तावित केले आहे. तसेच दरवर्षी सर्व प्रकारच्या दरांमध्ये वार्षिक पाच टक्के वाढ प्रस्तावित करण्याचे सुचविले आहे.
सहा हजार लिटरपर्यंत पाणी मोफत…
सहा हजार लिटरपर्यंत पाणी मोफत दिले जाणार असून सहा ते 15 हजार लिटरसाठी आठ रुपये आणि 15 ते 20 हजार लिटरपर्यंत 40 रुपये पाणीपट्टी आकारण्यात येणार आहे. 20 हजार लिटरपुढील वापरासाठी 100 रुपये पाणीपट्टी दर प्रस्तावित करण्यात आला आहे. 20 हजार लिटरपुढील वापरासाठी 100 रुपये पाणीपट्टी दर प्रस्तावित करण्यात आला आहे. व्यापारी पाणीवापरासाठीचा दर 55 रुपये असणार आहे.
अशी असेल दरवाढ…