घरफोडीच्या गुन्ह्यातील फरार आरोपींना अटक

0

भुसावळ । घरफोडीच्या गुन्ह्याप्रकरणी खंडवा कारागृहातील तीन आरोपींना बाजारपेठ पोलिसांनी सोमवार 12 रोजी अटक केली़ बाजारपेठ पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील संशयीत आरोपी बाबूलाल नागु राखुंडे (रा.कवाडे नगर, भुसावळ, छन्नु उंदरिया नन्नु भील (रा.टोकसर, ता.सणावड, जिल्हा – खरगोन व उमेश संपत भिल (रा.बेनपुरा डोंगरी ता.जि.खंडवा) यांना खंडवा मध्यवर्ती कारागृहातून ताब्यात घेऊन अटक करण्यात आली़

यांच्या पथकाने केली कारवाई
सहाय्यक पोलीस अधीक्षक निलोत्पल मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मनोज ठाकरे, एएसआय आनंदसिंग पाटील, शिवदास चौधरी, प्रवीण पाटील, विकास सातदिवे, अनिल पाटील, प्रशांत चव्हाण यांच्या पथकाने ही कारवाई केली़. भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात दाखल हल्ल्याच्या गुन्ह्यातील संशयित शेख आशिक बेग उर्फ बाबा असलम बेग (22, मुस्लीम कॉलनी, खडका रोड, भुसावळ) व शेख जुबेर शेख कमरूद्दीन (20, अलवानी मशिदीजवळ, भुसावळ) यांना देखील अटक करण्यात आली़ गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी पसार झाले होत़े. या आरोपींचा शोधही घेण्यात आला होता. मात्र काही कालाधीनंतर हे आरोपी शहरात असल्याची गुप्त माहिती पोलीसांना मिळाल्यावरुन सापळा रचून त्यांना अटक करण्यात आली आहे.