घरफोडीतील आरोपीने जिल्हापेठ कोठडीत केले स्वतःवर लोखंडी पट्टीने वार

0

आरडाओरड करत घातला गोंधळ : जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ केले दाखल

जळगाव – रामानंद पोलीस ठाण्यात दाखल घरफोडी गुन्ह्यात तांबापुरा येथील मोनुसिंग बावरी यास अटक करण्यात आली. न्यायालयात हजर करुन त्यास जिल्हापेठच्या कोठडीत ठेवताच त्याने स्वतःच्या हातावर, छातीवर लोखंडी पट्टीने वॉर करून आरडाओरड करत जखमी करून घेतल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सायंकाळी 5 वाजता घडली. त्याला उपचारासाठी जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान या घटनेने जिल्हापेठ पोलीस ठाण्यामधील अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांची एकच धांदल उडाली होती.

याबाबत माहिती अशी की, रामानंद नगर पोलीस ठाण्यात दाखल घरफोडीच्या गुन्ह्यात अगोदरच अटक असलेला संशयित आरोपी सोनूसिंग बावरी याला अटक करण्यात आली आहे. त्याने शहरातील अनेक घरफोड्याची कबुली दिली असून त्याच्या कडे गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. रामानंदनगर पोलीस ठाण्यात घरफोडीच्या दुसर्‍या गुन्ह्यात रामानंद नगर पोलिसांनी सोनूसिंगचा लहान भाऊ मोनूसिंग बावरी याला गुरुवारी पुन्हा अटक केली. शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता, त्याला 25 नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. रामानंद नगर ठाण्यात पोलीस कोठडी नसल्याने संशयित मोनुसिंग ला जिल्हापेठ कोठडीत ठेवण्यात आले. यानंतर काही वेळातच मोनुसिंगने पगडीला असलेली लोखंडी क्लिपने स्वतःच्या हातावर व छातीवर वार करून जखमी करून घेतले. त्याला जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

पोलीस त्रास देत असल्याचे न्यायालयात सांगणार

गेल्या वेळी तीन महिने कारागृहात होतो, बाहेर पडल्यावर मुंबईला गेलो होतो, तेथून जळगावात शुक्रवारी सकाळी आलो. यानंतर पोलिसांनी अटक करुन न्यायालयात हजर करण्यात आले. व पोलीस कोठडी सुनावली. पोलिसांकडून त्रास दिला जात असल्याने हे कृत्य केले. पोलिसांच्या त्रासाबद्दल न्यायालयात सांगणार असल्याचेही मोनुसिंग बावरीने पत्रकारांशी बोलतांना सांगितले.