घरफोडीतील संशयितांना 12 पर्यंत पोलिस कोठडी

0

जळगाव। घरफोडीतील संशयित चोरट्यांना 12 पर्यंत पोलिस कोठडी महाबळ परिसरातील दौलतनगरातील जुन्या पाण्याच्या टाकीजवळ चोरट्यांनी बुधवारी पहाटे 3.30 वाजेच्या सुमारास घरफोडी केल्यानंतर चोरलेला ऐवज घेऊन जात असताना रामानंदनगर पोलिस ठाण्याच्या गस्तीवरील पोलिस कर्मचार्‍याने त्यांना पकडले होते. त्यांच्याजवळ चोरी केलेला मुद्देमालही पोलिसांना मिळून आला होता. दरम्यान, आज गुरूवारी दोघांना न्यायाधीश के.एस.कुलकर्णी यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यांना 12 जुनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली तर अल्पवयीन चोरट्यास बालन्याय मंडळात हजर करण्यात आले होते.

घरफोडी करत 28 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेत होते चोरटे
दौलतनगरातील पाण्याच्या टाकीजवळ भरत शांताराम पाटील (वय 33) हे 2 जून रोजी ते कुटुंबियांसह गावाला गेलेले होते. हिच संधी पावून चोरट्यांनी त्यांच्या घरात चोरी करत एक एलइडी टिव्ही, एक इस्त्री, कॅमेरा, पितळाची समई असा 28 हजार 800 रुपयांचा ऐवज चोरून नेला. मात्र, मुद्देमाल चोरून घेवून जात असतांनाच रामानंदनगर पोलिस ठाण्याचे कर्मचारी तुषार विसपुते महाबळ परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी चैत्रबन कॉलनीजवळ असलेल्या सौरभ टेन्ट हाऊसजवळ तीन संशयीत जाताना दिसले. त्यांनी तिघांना हटकले असता त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी तिघांना पकडून ठेवले व चौकशी केली असता त्यांनी घरफोडीची कबूली दिली आणि त्यांच्याकडून चोरी केलेला मुद्देमाल मिळून आला. त्यानंतर आज गुरूवारी संशयित चोरटे राहूल नवल काकडे व सागर आनंद गायकवाड यांना न्यायाधीश के.एस.कुलकर्णी यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्या. कुलकर्णी यांनी दोघांना 12 जुनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. याप्रकरणी सरकारपक्षातर्फे अ‍ॅड. अविनाश पाटील यांनी कामकाज पाहिले. तर तिसरा अल्पवयीन संशयित चोरट्याला बाल न्यायमंडळात हजर करण्यात आले होते.

सहा जणांना पोलिस कोठडी
जळगाव- आव्हाणे येथे दोन गटात वाद झाला होता. या वादाचे रुपांतर हाणामारी होवून दंगलीची परिस्थिती निर्माण झाली होती. याप्रकरणी तालुका पोलिसात अ‍ॅट्रॉसिटी व दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात येवून पहिल्या गटातील सहा तर दुसर्या गटातील तीन असे 9 जणांना अटक करण्यात आली होती. तर अ‍ॅट्रॉसिटीती गुन्ह्यातील अमोल गोकुळ पाटील, देवेंद्र दत्तु पाटील, गोकुळ तुळशीराम पाटील, दत्तु तुळशीराम पाटील, प्रल्हाद तुळशीराम पाटील, प्रदिप प्रल्हाद पाटील या सहाही संशयितांना अटक केली होती. गुरूवार न्यायालयात हजर केले असता त्यांना पून्हा एक दिवसाची वाढीव पोलिस कोठडी सुनावली आहे.