जळगाव। कासमवाडी येथे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करत 27 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी एकाला अटक करून 19 पर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. त्याच्या पोलिस कोठडीची मुदत संपली असता त्याला आज न्या.शिंदे यांच्या न्यायालयात हजर केले असता 22 पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
कासमवाडी येथील गोपाळ भास्कर कुंवर यांच्या घरी 15 एप्रिलच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करत 27 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात पोलिसांनी हर्षवर्धन उर्फ शिवा सुदाम पवार यास 16 एप्रिलला अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता 19 पर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. आज बुधवारी त्याच्या पोलिस कोठडीची मुदत संपली असता त्याला न्या.शिंदे यांच्या न्यायालयात हजर केले असता 22 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी सरकारपक्षातर्फे अॅड. अनिल गायकवाड यांनी कामकाज पाहिले.