घरफोडीतील सराईत तीन गुन्हेगारांना बुलढाणा जिल्ह्यातून अटक, मुक्ताईनगर पोलिसांची कारवाई.

मुक्ताईनगर प्रतिनिधी…… मुक्ताईनगर पोलीस ठाण्यामध्ये दाखल असलेल्या घरफोडी गुन्ह्यातील तिघे सराईत गुन्हेगारांना बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील तिघांना मुक्ताईनगर पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे तिघे गुन्हेगारांकडून पोलिसांनी ६४५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तकत केलेला आहे. या कारवाईमुळे मुक्ताईनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी व पोलीस कर्मचारी यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

 

जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार , अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार शिंदे मुक्ताईनगर यांनी वेळोवेळी मालाविरुद्धचे दाखल असलेले गुन्हे उघडकीस आणणे करीता व सराईत गुन्हेगार तपासणी करणे बाबत पोलिसांना सुचना दिल्या होत्या.

 

मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस नाईक धर्मेंद्र ठाकुर यांना गोपनीय माहीती मिळाली की मुक्ताईनगर पोलीस स्टेशन सी सी टी एन एस गु.र.नं. 0351/2022 भादवि कलम 380, 457 दाखल घरफोडी 1) विशाल श्रीराम वावरे वय 22 रा. सोनाळा ता. संग्रामपुर जि. बुलढाणा, 2) आकाश रामेश्वर धामोळे वय 22 रा. टुणकी ता. संग्रामपुर जि. बुलढाणा, 3) विशाल गणेश विटेकर वय 22 रा. दुणकी ता. संग्रामपुर जि. बुलढाणा यांनी केली आहे. सदर बाबत ठाकूर यांनी पोलीस निरीक्षक नागेश मोहीते यांना माहिती दिली.

पोलीस निरीक्षक नागेश मोहिते त्यांनी पोहेकॉ विकास नायसे, पोलीस नाईक धर्मेंद्र ठाकुर, पोअं प्रशांत चौधरी अशांचे पथक तपास कामी रवाना केले. पोलीस पथकाने विशाल श्रीराम वावरे वय 22 रा. सोनाळा ता. संग्रामपुर जि. बुलढाणा, आकाश रामेश्वर धामोळे वय 22 रा. दुणकी ता. संग्रामपुर जि. बुलढाणा, विशाल गणेश विटेकर वय 22 रा. दुणकी ता. संग्रामपुर जि. बुलढाणा यांनी मुक्ताईनगर पोलीस स्टेशन सी सी टी एन एस गु.र.नं 351/2022 भा.द.वि.क 380,457 चे तपास कामी ताब्यात घेतले असता त्यांनी गुन्ह्याची कबुली देवुन चोरी केलेल्या मालापैकी खालील वर्णनाचा व किंमतीचा माल त्यांचे कडुन हस्तगत करण्यात आला आहे. यामध्ये रु.43,500/- कि.ची सॅमसंग कंपनीचा LED 43 ईच टी.व्ही.

, रु.5000/- कि.ची सॅमसंग कंपनीचा F-12 मोबाईल , रु.4000/- कि.ची VIVO Y12 कंपनीचा मोबाईल , रु. 12000/- किं.ची काळ्या रंगाची मोटार सायकल गुन्ह्या करतांना वापरलेली असे

 

रु.64,500 किंमतीचे मुद्देमाल काढुन दिला सदरची कामगीरी ही उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार शिंदे व पोलीस निरीक्षक नागेश मोहीते यांचे मार्गदर्शनाखाली पो.उप.निरी. राहुल बोरकर, पोहेकॉ विकास नायसे, पोना धर्मेंद्र ठाकुर, पोअं रविंद्र धनगर, पोअं प्रशांत चौधरी यांनी केलेली आहे. गुन्ह्याच्या पुढील तपास पोहेकॉ विकास नायसे करीत आहेत.